१०० व्या नाट्यसंमेलनासाठी हवी ती मदत करणार; आदेश बांदेकर

१०० व्या नाट्यसंमेलनासाठी हवी ती मदत करणार; आदेश बांदेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: नागपुरातील धनवटे रंगमंदिर व वसंतराव देशपांडे सभागृहाने माझ्या आयुष्यात नवीन वळण आले. नागपूरचे नाट्यकलावंत सुरेश मगरकर यांनी १९८४ मध्ये गर्दीत असलेल्या आदेश बांदेकरला प्रभाकर पुराणिक लिखित चेतना चिंतामणीचे गाव या नाटकात भूमिका दिली. त्याच काळात राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने धनवटे रंग मंदिरात नाटक करण्याचा योग आला आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नाट्य कलावंत स्वत:ला घडवू शकलो,” असेही बांदेकर म्हणाले.

मालिकेच्या माध्यमातून साडेपाच हजार घरात जाऊन स्त्रिंयांचा सन्मान करता आला. महिलांवर अत्याचार होतात. मात्र कोल्हापूर च्या एका महिलेने सांगितलं की प्रत्येक घरात असे भाऊजी असायला पाहिजेत म्हणजे नाते घट्ट होतात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी माझा तसा संबंध नाही पण शंभरावे नाट्य संमेलन जोरात व्हावे, यासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल ती करायला मी तयार असल्याचे आश्वासन बांदेकर यांनी दिले.

राजकारणात येण्याचा कुठलाच विचार नव्हता मात्र, बाळासाहेबांवर माझी श्रद्धा होती. कलावंत म्हणून काम करताना काही न मागता मला शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता विधानपरिषदेबाबत मी विचार केलेला नाही. पक्षाकडून काही मागण्यापेक्षा काम करत राहिले तर पक्षच तुमची दखल घेतो असे अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले.

आदेश बांदेकर त्यांच्या होम मिनिस्टर या दूरदर्शनवरील एका मालिकेच्या ऑडिशनसाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खरेतर रंगमंच व मालिकांमध्ये काम करत असताना शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचा सचिव झालो. त्यानंतर पक्षाने माझ्यावर सिद्धी विनायक मंदिराचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानिमित्ताने राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पक्षाने जे आदेश दिले त्या आदेशानुसार काम करत आहे. काही मागण्यापेक्षा आपण काही देऊ शकतो याचा विचार करत असतो असेही बांदेकर म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles