कान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘गोदावरीची’ निवड

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘गोदावरीची’ निवडपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_जितेंद्र जोशीच्या निमित्ताने मराठीचा झेंडा अटकेपार_

मुंबई: भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या स्क्रिनिंगसाठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत ‘गोदावरी’ला मानाचे स्थान!” असे जितेंद्रने पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्याचबरोबरीने नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले या कलाकारांच्या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठी पाऊल पडते पुढे हे अभिमान गीत आता ख-या अर्थाने सार्थ होऊ लागलं आहे. सगळ्याच क्षेत्रात मराठीने आपल झेंडा अटकेपार रोवला आहे. मराठी सिनेविश्वासाठी एक अभिमाना्पद बातमी नुकतीच समोर आली आहे. मानाच्या समजल्या जाणा-या कान्स या आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेता जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. आता मराठी चित्रपट सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. सर्वोत्तम कथानक ही मराठी सिनेमाची जमेची बाजू आहे.

जितेंद्र जोशीचा निर्माता म्हणून ‘गोदावरी’ हा पहिलाच चित्रपट. आपल्या पहिल्याच चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळवल्याने त्याचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे. जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गोदावरी’चं पोस्टर शेअर करत ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेयर केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles