वंजारी समाजातर्फे गोपीनाथ मुंढे यांना श्रद्धांजली
हिंगणघाट: महाराष्ट्राचे लोकनेते, बहुजनांचे कैवारी, वंजारी समाजाचे लाडके नेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंजारी समाज सेवा मंडळ, हिंगणघाटच्या वतीने दि ३जून रोजी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुंढे याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी आदरांजली वाहिली. वंजारी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विजुभाऊ घात्रक, उपाध्यक्ष सारिकाताई करपे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अरूणाताई हेमके, पी.एस.आय टापरे साहेब, मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
वंजारी समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी श्री.हमद साहेब निलेसजी नवहाते,कवडूजी साळवे, रविभाऊ कापकर, करपे जी, वामन भाऊ आखाडे, गजानन राव कानकाटे, संजय राव भारसकर, सचिन काटकर, अशोक राव साठे तसेच सौ.मायाताई घात्रक, प्रतिभाताई साळवे, पोर्णिमाताई घात्रक व समाज बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.