आता.. ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून होणार साजरा

आता.. ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून होणार साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रायगड/ मुंबई: रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. 6 जून 1674 रोजी झाला. या दिवशी ते छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे अधिपती झाले. ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेकदिन विविध उपक्रम किल्ले रायगडावर साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात यापुढे 6 जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य ग्रामविकास विभागाने स्पष्ट केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यापूढे 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकिय कार्यालयात सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येणार आहे. त्यामूळे सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ही राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिनाकडे पहावे लागते. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी म्हणून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2022 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles