दिपाली सय्यद हत्या कट प्रकरण; भाजपच्या ११ महिलांविरोधात तक्रार

दिपाली सय्यद हत्या कट प्रकरण; भाजपच्या ११ महिलांविरोधात तक्रार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: मराठी अभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि भाजप महिला मोर्चा यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. भाजपच्या महिला मोर्चाकडून धमकी मिळाल्यानंतर दिपाली सय्यद यांच्याकडून भाजपा महिला मोर्चातील अकरा महिलांविरूद्ध ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी दिव्या ढोले, मनिषा जैन वर्षा डहाळे, रीदा रशिद, कविता देशमुख, प्रिया के. शर्मा, रिटा मखवाना, मंजु वैष्णव, दिपाली मोकाशी , प्रणीता देवरे आणि नयना वसानी यांचा समावेश आहे. भाजपच्या या सर्व महिला पदाधिकाऱ्यांवर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात दिपाली सय्यद आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप दिपाली सय्यद यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. दिपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढण्याचा इशारा दिला होता, यानंतर आता दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्या उमा खापरे आणि त्यांच्या महिला पदाधिकार्यांना हत्येचा कट रचल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टीका केल्याने भाजप नेत्या उमा खापरे यांनी त्यांना थेट घरात घुसून बदडून काढण्याचाच इशारा दिला. यापुढे जर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्ये केले तर तिला घरात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला होता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles