‘माहेश्वरी संस्थे’तर्फे हिंगण्यात महेश नवमी उत्सव उत्साहात

‘माहेश्वरी संस्थे’तर्फे हिंगण्यात महेश नवमी उत्सव उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात माहेश्वरी संस्थेतर्फे महेश नवमी उत्सवा निमित्त विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन करून महेश नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. अर्चना कोठारी, आयएमएच्या सहसचिव, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग, विदर्भ विभागीय महिला संघटनेच्या सचिव सुषमा बंग, दिनेश बंग सदस्य जिल्हा परिषद नागपूर आणि नागपूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा किरण बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत, 5 जून 2022 रोजी, रविवारी सकाळी नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात सर्वांसाठी इनडोअर, आऊटडोअर, खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच याप्रसंगी आयोजन करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महेश पूजनाने दीपप्रज्वलनाने झाली, जागतीक पर्यावरण दिनानिमित्त मुलांकडून घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली, सामाजिक विषयांवर चिंतन करताना व्याख्याने, राजस्थानी नृत्य, गाणी, आणि नाटकाचे सुंदर सादरीकरण महिलांनी केले, शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, कार्यक्रमाचे समाज बांधवांनी भरभरून कौतुक केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बंग, सचिव पवन बंग, यांनी कार्यक्रम यशस्वी केला. यश, महिला अध्यक्षा सौ. ममता बंग, सचिव सौ. श्वेता मिनियार व सर्व कार्यकारी मंडळाने अथक परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles