
लाखांदुरात ‘आमची माती आमची माणसं’ कार्यशाळा संपन्न
भंडारा: जिल्ह्यातील लाऐखादूर तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी ‘जागतिक परिवार दिन’ व ‘लॅप टू लॅड’ या कार्यक्रमांतर्गत कल्पतारा फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे ‘आमची माती आमची माणसं’ या विशेष कार्यशाळेचे, रविवार दिनांक 5 जून 2022 ला सायंकाळी 6.30 वाजता खोलमारा ता.लाखांदूर येथे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमृत जी मदनकर सरपंच खोलमारा व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मा. ओमप्रकाशजी हिरे मुद्राशास्त्रज्ञ नाशिक हे होते, यावेळी गावातील 200 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश गिर्हपुजे व गणेश गिर्हपुजे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण रणदिवे यांनी केले.