शुभेच्छांच्या वर्षावाने चिंब चिंब झाले; डॉ पद्मा जाधव

शुभेच्छांच्या वर्षावाने चिंब चिंब झाले; डॉ पद्मा जाधव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सस्नेह नमस्कार 🙏

आज माझ्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वांनी हृद्य शुभेच्छांचा वर्षाव केला. या शुभेच्छांच्या वर्षावाने मन चिंब चिंब तर झालेच पण माझा जन्मदिवस खऱ्या अर्थाने वाढदिवस ठरला अशी मनोमन जाणीव झाली.

मराठीचे शिलेदार समूह हा खऱ्या अर्थाने आप्तस्वकीयांचा समूह आहे. इथे जुळलेली नाती कोणत्याही स्वार्थाशिवाय जुळलेली आहेत. ही नाती मराठीच्या, मायबोलीच्या सक्षमीकरणाच्या ध्येयाने झपाटलेल्या मनांची ही नाती आहेत. म्हणून इथं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आत्मीयता हे सर्व ओतप्रोत भरून नित्य प्रवाहित असते.

आपल्या समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री राहूल दादा आपल्यामुळे या सर्व आप्तस्वकीयांच्या सहवासाचा योग जुळून आला. आपले समूह क्रियाशील ठेवण्यामध्ये असलेले योगदान अतुलनीय आहे. आज आपण आपल्या व्यस्ततेमधून वेळ काढून शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपल्या ऋणात राहू इच्छिते.

समूहातील सर्व सन्माननीय, आदरणीय ताई दादा खरेच आपला सर्वांचा स्नेह मला नेहमीच प्रोत्साहित करतो. समूहाची कवच कुंडले म्हणजे वैशालीताई आणि सविता, सुधा ताई, श्री प्रशांतदादा, श्री.कुमठेकर सर, राजू नवगाने दादा, तारका ताई, कोम्पलवार दादा, हंसराज दादा, डॉ. संजयदादा, शिर्के दादा, दत्ता दादा, वसुधा ताई, स्वाती ताई, राजश्री ताई, कुसुम ताई, अनिता ताई, मीनाक्षी ताई आणि समूहातील सर्व ताई दादा, आपण सर्व जण आपापल्या क्षेत्रात अत्यंत तज्ज्ञ आहात तरी देखील गुणग्राहकतापूर्ण आपला स्वभाव असल्यामुळे आपण अत्यंत भावस्पर्शी अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते.

✍️दोन शब्द आपणा सर्वांसाठी

*झरा चैतन्याचा*

समूह आपला भला
मित्र मैत्रिणींचा मेळा
नित्य चालतो इथं
शुभचिंतन सोहळा

कार्यमग्न सारेच नित्य
नाही वेळ घेण्या उसंत
वेळापत्रक सारे व्यस्त
निभावणं मैत्री असे पसंत

वर्षाव जन्मदिनी शुभेच्छांचा
मनी कल्लोळ दाटे भावनांचा
सुगंध हर्षवितो मना मैत्रीचा
असाच राहो झरा चैतन्याचा
असाच राहो झरा चैतन्याचा

धन्यवाद 🙏

डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles