
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण
नागपूर: राज्याच्या उपराजधानीत भदंत हर्षबोधी यांनी नागपुरातील संविधान चौकात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वर्षभर एका कुटुंबाने दररोज माल्यार्पण करण्याच्या या अभियानास बौध्द पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आली. आज दि १२ जून रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष पूरण मेश्राम यांच्या उपस्थितीत नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आली.
आज सकाळी 8 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. ‘एक हार एक परिवार’ या संकल्पनेचे कौतुक करीत त्यांनी प्रत्येक रविवारच्या माल्यार्पण कार्यक्रमाच्या चळवळीतून समाजाला एकत्रित करण्याच्या भावनेची प्रशंसा केली, तसेच बौद्ध समाजाने महामानवाला हार अर्पण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी ब्रह्मपुरीचे प्रा युवराज मेश्राम यांनी आपल्या वक्तव्यातून बाबासाहेबांच्या सर्व समाजाप्रती उदार भावनेचे स्प्षटीकरण करीत बाबासाहेबाना केवळ एका समाजापुरते मर्यादित न ठेवता साऱ्या समाजाकरिता मोकळे करावे. त्याकरिता इतर लोकांनाही कार्यक्रमात आमंत्रित करण्याचा सल्ला दिला. भदन्त् हर्ष बोधी द्वारा संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पुज्यनीय बोधगयेच्या भन्तेजीद्वरा सर्वांनी पंचशील ग्रहण केले. कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व् मान्यवरान्चे पुष्प गुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला हिंगणघाटचे अरविंद सांगोळे, शीला बोरकर ,नागपूरचे निमंत्रक अतुल जामगडे, त्रिवेणी पाटील एडवोकेट ताकसांडे, ज्योती बेले तसेंच सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.