डॉ.रवींद्र होळी यांची गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी भरघोस देणगी

डॉ.रवींद्र होळी यांची गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी भरघोस देणगी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गडचिरोली: डॉ.रवींद्र होळी, तहसीलदार, ता. मुल जि. चंद्रपूर यांनी गोंडवाना विद्यापीठाला सोमवारी भेट देवून आपल्या आई -वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतजी बोकारे ह्यांना १ लक्ष ५० हजार रूपयांचे २ धनादेश आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते प्रदान केले.

मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून तहसीलदार डॉ रवींद्रजी होळी यांनी स्नातक परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंतांना सुवर्णपदक जाहीर करत त्यासाठीचा धनादेश आ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते विद्यापीठाकडे सुपूर्द केला.

गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने सत्र २०२१-२२ पासुन कला स्नातक (बी. ए) या विषयात अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला रविंद्र होळी यांच्या आई स्व. मंजुळाबाई साधुजी होळी. रु. १,५०,०००/- (एक लक्ष पन्नास हजार रु. फक्त) तसेच विज्ञान स्नातक (बि.एस्सी) या विषयात अनुसुचित जमाती (एस. टी) प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना त्यांचे वडील स्व. साधुजी पाटील होळी या नावाने सुवर्ण पदका करिता विद्यापीठात रु. १,५०,०००/- (एक लक्ष पन्नास हजार रु. फक्त) असे एकुण रु.३,००,०००/- (तिन लक्ष रु. फक्त) असा धनादेश जमा केलेला आहे.

आमदार डॉ.देवराव होळी यांचे पुतणे असलेले डॉ.रविंद्र होळी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या आई वडिलांच्या कठोर परिश्रमाने आज उच्च पदावर सेवारत आहेत. त्यांच्या आई व वडिलांचा २०२२ या एकाच वर्षी झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. गरीब आदिवासी विद्यार्थांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर व्हाव्यात अशी त्यांच्या आई वडिलांची नेहमीच तळमळ राहिली. आपल्या वडिलांचे ४ थ्या वर्गाचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे पुर्ण करू न शकल्याचे दुःख नेहमीच राहिले. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर राशी सुवर्ण पदकासाठी देत असल्याची माहिती डॉ रविंद्रजी होळी यांनी यावेळी दिली.

या सुवर्ण पदकामुळे आपल्या आदिवासी नक्षल ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी बहुमुल्य योगदान लाभेल. या क्षेत्रातील विद्यार्थांना त्यातून निश्चितच प्रोत्साहन मिळेल असे म्हणत डॉ.रविंद्रजी होळी यांनी दिलेला धनादेश कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारे यांनी स्विकारला व होळी परिवाराचे आभार मानले . यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. नरेश मडावी आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles