शिक्षण उपसंचालकासोबत विज्युक्टाची सहविचार सभा संपन्न

शिक्षण उपसंचालकासोबत विज्युक्टाची सहविचार सभा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

हिंगणा :- विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनची सहविचार सभा आज दि १५ जून रोजी शिक्षण उपसंचालक डॉ.वैशाली जामदार यांच्यासोबत डॉ.अशोक गव्हाणकर विज्युक्टा महासचिव यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. कार्यालयाच्या वतीने सहा.शिक्षण उपनिरीक्षक शेखर पाटील, लेखाधिकारी राऊत, सहायक डुमरे, गिऱ्हे व राठोड प्रमुख्याने उपस्थित होते.

आयोजित सभेत खालील विषयांवर चर्चा होऊन शिक्षण उपसंचालकांनी काही प्रश्न ताबडतोब निकाली काढण्याचे मान्य केले.ज्यामधे जी.पी.एफ. व डी.सी.पी.एस. च्या पावत्या ताबडतोब वितरित करण्याबाबत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचे निवेदन आयुक्तांना पाठविण्याबाबत, सत्र २०१९ – २० व २०२० – २१ मध्ये तुकड्या विना अनुदानित झाल्या असतील, परंतु २०२१ – २२ मध्ये विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यास त्यांना अनुदानावर कायम ठेवण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी संख्या कमी होऊन तुकडी विनाअनुदानित झाली तरी शिक्षकांचे वेतन अनुदानावर कायम ठेवण्याबाबत, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी दोन विषयाची माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत, सेवा सातत्य, खाते मान्यता, व वर्धित मान्यता ताबडतोब दिली जाईल, वैद्यकीय बिले,थकीत बिले व जी.पी.एफ.बिले नियमाप्रमाणे मंजूर केले जातील.

दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः किंवा विना अनुदानावर नियुक्त जी.पी.एफ.डी./सी.पी.एस.किंवा एन.पी.एस. खाते नसणाऱ्या शिक्षकांना ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाचे थकीत हफ्ते रोखीने अदा करण्याची शिफारस सरकार कडे करण्याबाबत ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाला १ जुलैची वेतन वाढ देण्याची शिफारस केली जाईल, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शिफारस सरकार कडे पाठविली जाईल, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शिफारस केली जाईल, कायम शब्द वगळलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करण्याची शिफारस सरकारकडे केली जाईल, घड्याळी तासिका तत्वावर शिक्षकांच्या नियुक्तीला नियमाप्रमाणे ताबडतोब मंजुरी दिली जाईल. तसेच नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिंया, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न ताबडतोब निकाली काढण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे यानंतरही काही प्रश्न असल्यास निकाली काढण्याचे आश्वासन संघटना पदाधिकाऱ्यांना दिले.

या सभेला विजुक्टा महासचिव डॉ.अशोक गव्हाणकर, उपाध्यक्ष प्रा.विलास केरडे, सहसचिव प्रा.जयंत ढगले, वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रा. नुरसिंह जाधव, गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रा.एम.जी. दस्तवगिर, सचिव प्रा.पी.झेड.कटरे, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रा.मार्तंडराव गायधने, सचिव प्रा.आर. डब्लू. दोनाडकर, के.का.सदस्य प्रा. एस.एन.कोहपरे, प्रा.धनंजय पारके, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेंद्र खाडे, सचिव प्रा. डी.बी. हेपट, नागपूर जिल्हा ग्रामीण सचिव डॉ.नितीन देवतळे, नागपूर शहर कार्याध्यक्ष डॉ.चेतन हिंगणेकर, प्रा. डी.एस.बिसेन, प्रा. टी.एस.शेंडे, प्रा.पी. डब्लु.भोयर, प्रा.एन.के.लिंगे, समीर ठवकर व प्रा.हर्षद घटोले प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles