17 रोजीच्या अमन मोर्चात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभागी व्हावे!

17 रोजीच्या अमन मोर्चात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभागी व्हावे!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_वंचित बहुजन आघाडीचे आवाहन_

नागपूर: दि. 17 जून रोजी दुपारी 2.00 वाजता मदनपुरा येथील वंचित बहुजन आघाडीच्या ऑफीस पासून आझाद मैदान पर्यंत अमन मोर्चा निघणार आहे. या अमन मोर्चात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभागी व्हावे. विषयाचे गांभीर्य व महत्त्व लक्षात घेऊन या अमन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचा विषय आता भारताचा अंतर्गत मामला राहिलेला नाही. हा विषय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला आहे. विविध धर्मांचे जे प्रेषित वा महात्मा आहेत जसे की मुस्लीमांचे महम्मद पैगंबर, ख्रिश्चनांचे जीझस क्राईस्ट, जैनांचे महावीर जैन, बौद्धांचे गौतम बुद्ध, हिंदूंचे प्रमुख इ. यांना मानणारे विविध धर्मांचे फॉलोअर्स जगभरात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळेच या महात्म्यांच्या मान सन्माना बद्दल परदेशातील विविध धर्मिय जनता व त्यांची सरकारे संवेदनशील आहेत. त्यामुळेच महम्मद पैगंबरां बद्दलच्या नूपूर शर्मांच्यातअपमान कारक वक्तव्या बद्दल मध्यपूर्वेतील देशांनी नाराजी व्यक्त केली व युरोपीय देशामधेही नाराजी आहे.

भारतीय मुसलमान आजपर्यंत इस्लामिक दहशतवादी संघटनांना बळी पडला नाही. 99% मुसलमान भारताशी प्रामाणिक राहिला. या मुस्लीमाला आज अवमानित केल्याची भावना आहे. केंद्र शासनाला या प्रश्नावर संवेदनशील करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने अमनमोर्चा आयोजित केला आहे. शरद पवारांचा अपमान करणाऱ्या केतकी चितळेला ताबडतोब अटक करून जी संवेदनशीलता मविआ सरकारने दाखवली ती संवेदनशीलता जामिनपात्र नसलेले वक्तव्य करणार्‍या नूपूर शर्मा व नवीन जिंदाल यांचा अटक करून केंद्र सरकार का दाखवत नाही हा प्रश्न आहे.

या असंवेदनशील धोरणामुळे भारताबाहेर रहाणारा हिंदूही धोक्यात येऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी सेक्युलर पक्ष संघटना व व्यक्तीना आवाहन करत आहे की व्यापक जनहिताच्या भूमिकेतून अमनमोर्चा मधे सहभागी व्हावे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles