‘हिट्स बेस्ट ऑफ 90’च्या दशकातील रंगारंग सुपरहिट गाण्यांचे आयोजन

‘हिट्स बेस्ट ऑफ 90’च्या दशकातील रंगारंग सुपरहिट गाण्यांचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: एस.ए.एंटरटेनमेंट प्रस्तुत बिशप कॉटन ग्राउंड, सिव्हिल लाईन येथे दि. 16 जून , सायंकाळी 6 ते 10 या दरम्यान बॉलीवूडच्या ‘हिट्स बेस्ट ऑफ 90’च्या दशकातील रंगारंग सुपरहिट गाण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

ए एस इंटरटेनमेंट प्रस्तुत ही संकल्पना अनिता मसरामची यांची असून आयोजनही यांनीच केले आहे. या कार्यक्रमांचे मुख्य अतिथी प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रकाश गजभिये आणि आंतरराष्ट्रीय तबला आर्टिस्ट डॉ. प्रशांत गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. तसेच पत्रकार वनश्री पंधरे आणि शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र कोडवते उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात तेजाब फिल्मचे गाणे एक, दो, तीन, या गाण्याची ओपनिंग अनिता मसराम करतील व कार्यक्रमाला सुरुवात होईल. आयोजक आणि गायिका अनिता मसराम, संगीत सौरभ किल्लेदार, गायक कलाकार प्रतीक चोखांद्रे, अक्षय देशमुख, कुमुद चोखांद्रे, डॉ. सुनील मेश्राम, डॉ. अरुण घायवत, सुनिता मुंजेवार, अनिता खांबरे, वंशिका फुले, संगीता फुले, आणि टी.के.बालकृष्ण हे 90 च्या दशकातील सुपरहिट गाणें सादर करतील. असे संयोजक अनिता मसराम यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles