वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांचा निरोपीय सत्कार

वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांचा निरोपीय सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा- हिंगणा वन परिक्षेत्रात पाच वर्षाच्या उत्तम कामगीरी नंतर आशिष निनावे यांची बदली झाल्यामुळे नुकताच त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी रिना राठोड होत्या. सर्वप्रथम वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांचा वनपरिक्षेत्र अधिकारी रिना राठोड यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. तिन वर्षाचा कालावधी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर माझी बदली झाली. परंतु त्यानंतरही माझ्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. असा पाच वर्षाचा कालावधी सर्वांच्या सहकार्यामुळे अतिशय चांगला गेला. त्यामुळे सर्वांचे आभार मानतो.असे मनोगत आशिष निनावे यांनी व्यक्त केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मला सहकार्य मिळाले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी सुद्धा त्यांच्या सारखेच वागण्याचा प्रयत्न करील. तसेच काही अडचण आली तर वेळोवेळी त्यांच मार्गदर्शन घेईल.असे मत नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी रिना राठोड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गजानन ढाकुलकर, प्रा.पियुष पोकळे, विनायक इंगळे, हिंगणा क्षेत्र सहाय्यक यु.बी.भामकर व वनरक्षक अडेगांवच्या वनरक्षक मिनाक्षी गोनमारे यांनी सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामगीरीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सावंगी क्षेत्र सहाय्यक नामदेव केंद्रे यांनी तर आभार सचिन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार संतोष कटरे, राजेंद्र सांभारे व हिंगणा वनपरिक्षेत्रातील श्री.डी. एस. राऊत ,एस. आर. टाकसांडे, एस. डब्ल्यू तिरपुडे, एम.एम. भराडे , व्ही. ए.शेंदरे , एन.जी.भेंडाले, आर.व्ही.राऊत, श्री पारधी, प्रकाश तसेच सर्व वन कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles