‘मस्तं चालंलय आमचं’; म्हणत अजित पवारांनी उडवला विखे पाटलाचा धुव्वा

‘मस्तं चालंलय आमचं’; म्हणत अजित पवारांनी उडवला विखे पाटलाचा धुव्वा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. “विखे पाटील आणि पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. असे ते म्हणाले होते. तसेच दादांचा स्वभाव उत्तम असून ते कार्यक्षम आहेत असेही ते म्हणाले होते. मात्र विखे पाटलांनी दिलेले आमंत्रण अजित पवार यांनी धुडकावून लावले आहे. ‘आमचं मस्त चाललंय’, असं म्हणत त्यांनी विखे पाटलांचा धुव्वा उडवला.

अहमदनगरमधील राजकारण सर्वश्रुत आहे. त्यात विखे-पवार यांच्यात चालणारे राजकीय संघर्ष देखील सर्वश्रुत आहे. परंतु लोणी इथल्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विखे यांची मुलाखत घेतली.

यात बोलताना त्यांनी पवार-विखे संघर्षावर भाष्य केले होते. विखे-पवार कुटुंबातील संघर्षाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर त्यांनी मतभिन्नता असल्याचं सांगत अजितदादा स्पष्टवक्ते आहेत, त्यांनी पुन्हा भाजपसोबत यावं, अशी खुली ऑफर दिली. विखे पाटलांच्या ऑफरवर अजितदादांनी आज बारामतीत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी जुजबी बोलून अधिकचं उत्तर देण्याचं टाळलं.

सदर कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीत झालेला दगाफटका, आता विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, अशा प्रश्नांना अजित पवारांनी उत्तरं दिली. शेवटी जाता पत्रकारांनी अजित पवार यांना विखेंच्या ऑफरवर प्रश्न विचारला. यावेळी ‘मस्त चाललंय आमचं’ एवढ्या तीन शब्दांचं पण पुरेसं बोलकं उत्तर दिलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles