
घरफोडीतील साडे ९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपीस अटक १ फरार
_नागपूर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी_
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे जाणवते. गुन्हे शाखा प्रकटीकरण युनीट क्र १ च्या पोलीस टीमने शहरात दि. १० जून रोजी मध्यरात्री घडलेल्या मोठ्या घरफोडी करणा-या आरोपीस अटक करून त्यांच्याकडून साडे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कटात सहभागी असलेला मुख्य सुत्रधार संम्मेत उर्फ पोंगा संतोष दाभने हा फरार असून, मंथन दाभने व विकास दाभने रा. प्रताप नगर नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शरद दुर्गाप्रसाद त्रिपाठी वय- 60वर्ष, रा-यु/ 36 सोसायटी, विर हनुमान मंदिर जवळ, नरेद्र नगर, बेलतरोडी, नागपूर यांच्या घरी दि १० जून रोजी मध्यरात्री १२.३० ते ४.०० च्या दरम्यान मंथन उर्फ दद्दया संतोष दाभने, वय- 19वर्ष, रा- सुभाष नगर, गल्ली नंबर 2, आय.टी. पार्क जवळ, पो.स्टे. प्रताप नगर नागपूर, विकास वसंतराव दामने, वय-27वर्ष, रा- सुभाष नगर, पो.स्टे. गल्ली नं.2, पो.स्टे. प्रताप नगर नागपूर सम्मेत उर्फ योगा संतोष दाभने या तीन आरोपींनी घरफोडी करून तब्बल साडे ९ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचे दागीणे एकूण कि. अं.5.40.291/- रु, चांदीचे दागीने एकूण कि. अं. 9820 /- रू, दोन मोबाईल कि.अ. 35000/- रू व एक पल्सर गाडी क. एम.एच.31/ सी.झेड 1009 के.ए. रु. 1,60,000/- रोख रु. १,६३,६४०/- दोन्ही कॉलेज बॅग ६००/- रु. याचा समावेश असून यातील दोन आरोपी मंथन दाधने व विकास दाभने यांना अटक करण्यात आली असून संम्मेत दाभने हा फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर शहर गुन्हे शाखा प्रकटीकरण युनीट क्र १ चे नितीन पंतंगे, सपोनि / राजेन्द्र गुप्ता, सपोनि / समाधान बजबळकर, सफौ. / वसंता चौरे पोहवा / अक्षय सोरदे पोहवा / प्रदिप पवार, नापोशि/ सुनित गुजर, नापोशि/ शरद चांभारे, नापोशि/ सुशांत सोळंके, नापोशि/ हेमंत लोणारे, नापोशि/ सुशिल नंदेश्वर, योगेश सेलुकर व नापोशि/ चंद्रशेखर भारती तसेच सायबर सेलने तपासात सहकार्य केले.
या गुन्ह्यातील आरोपी मंथन दाभने हा घरफोडी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहरात सदरची कारवाई मा.श्री. पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब, अपर पोलीस आयुक्त मा.श्री नविनचंद्र रेड्डि सा. (गुन्हेशाखा), पोलीस उप आयुक्त श्री चिन्मय पंडीत साहेब (डिटेक्शन), सपोआ रोशन पंडीत (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनाखाली वरील अधिकरी व कर्मचारी यांनी केली.