आज फादर्स डे…!पोलीस दलातील ‘एएसआय’ अक्रम पठाण यांच्या कार्यास मानाचा मुजरा

आज फादर्स डे…!पोलीस दलातील ‘एएसआय’ अक्रम पठाण यांच्या कार्यास मानाचा मुजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मुलांच्या करिअरसाठी जन्मदात्यांचा त्याग!_

_कुणी केली सलग बारा वर्षे ‘नाईट शिफ्ट’, तर कुणी घेतली स्वेच्छा निवृत्ती_

✍️सतीश भालेराव, नागपूर

नागपूर, ता. १८ : एखादा खेळाडू घडविण्यासाठी जेवढी मेहनत त्याची स्वतःची व प्रशिक्षकांची असते, तितकेच योगदान त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई वडिलांचेही असते. विशेषतः ड्युटी आणि मुलाची प्रॅक्टिस अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या वडिलांना खूप त्याग करावा लागतो. उपराजधानीतील अनेक जन्मदात्यांनी त्याग व समर्पणाची भावना दाखवून जिद्दीने आपल्या मुलांचे करिअर घडविले आहे.

‘फादर्स डे’च्या पार्श्वभूमीवर ‘बिनधास्त’ न्यूजने खेळाडू-मुलांसाठी त्याग व तपश्चर्या करणाऱ्या वडिलांचा संघर्ष जाणून घेतला असता, काहींनी मुलाच्या उज्ज्वल करिअरसाठी चक्क ‘व्हॉलंटरी रिटायरमेंट’ घेतल्याचे दिसून आले, तर काही वर्षानुवर्षे नाईट ड्युटी करताहेत. पित्याच्या त्याग व बलिदानाचे हे अनोखे उदाहरण निश्चितच सुखावणारे व आनंद देणारे आहे.

_मुलीसाठी बारा वर्षांपासून ‘नाईट शिफ्ट’ करणारे नागपूर पोलिस विभागाचे “एएसआय” अक्रम पठाण_

नागपूरची पहिली आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा अल्फिया पठाणने स्वतःच्या मेहनतीवर झेप घेतली असली तरी, यामागे तिचे वडील अक्रम पठाण यांचीही तपश्चर्या व त्याग कारणीभूत आहे. शहर पोलिस दलात एएसआय म्हणून कार्यरत असलेले अक्रम पठाण यांनी मुलीला सकाळ-संध्याकाळ प्रॅक्टिसला नेता यावे, यासाठी तब्बल बारा वर्षांपासून ‘नाईट शिफ्ट’ केली आणि आजही करीत आहेत. ही सवलत मिळावी, यासाठी त्यांना अनेकवेळा पोलिस आयुक्तांना विनंती करावी लागली. अक्रम पठाण यांची तिन्ही मुले-मुली खेळाडू आहेत. थोरला साहिल राष्ट्रीय स्तरावरील अथलिट, धाकटा साकीब नॅशनल बॉक्सर आणि अल्फियाही आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. वडिलांची जिद्द, सपोर्ट व आर्थिक पाठबळामुळेच तिन्ही मुलांनी क्रीडा क्षेत्रात नाव कमावले आहे.

खरं तर मुस्लिम समाजातील महिला घुंघट व बुरख्यात वावरणाऱ्या आहेत. अशावेळी तरुण मुलीने टी-शर्ट व हाफ पॅन्ट घालून मैदानात उतरणे, ही कल्पनाच करवत नाही. मात्र अक्रम पठाण यांनी समाज काय म्हणेल याची चिंता न करता आपल्या मुलीला बॉक्सर बनविण्याचे धाडस केले. १९ वर्षीय अल्फियानेही ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनून त्यांचा विश्वास सार्थ ठरविला. सरावाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच ते मुलीसोबत राहिले. उल्लेखनीय म्हणजे पोलिसांची व्यस्त ड्युटी सांभाळून त्यांनी आपल्या मुलीला घडविले आहे.

*क्रिकेटर मुलासाठी घेतली स्वेच्छा निवृत्ती…*

विदर्भाचा युवा फिरकीपटू हर्ष दुबेच्या वडिलांनीही काही कमी त्याग केला नाही. त्यांनी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चक्क स्वेच्छा निवृत्ती अर्थात ‘व्हॉलंटरी रिटायरमेंट’ घेतले. हर्षचे वडील सुरेंद्र दुबे हे सीआयएसएफमध्ये नोकरीवर होते. मात्र लहानग्या हर्षला क्लबमध्ये प्रॅक्टिससाठी नेताना शिक्षिका असलेल्या त्याच्या आईची (ज्योती) चांगलीच घायतोड व्हायची. हर्षचे उज्ज्वल करिअर डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ४७ वर्षीय सुरेंद्र यांनी ‘व्हीआरएस’ घेतला. मुलानेही क्रिकेटमध्ये गरुडझेप घेत त्यांचा विश्वास सार्थ ठरविला.

१९ वर्षीय हर्षने ज्युनिअर क्रिकेटसह विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी बजावली. हर्षने गुजरातमध्ये अलीकडे संपलेल्या २५ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी.के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ४५ गडी बाद करत विदर्भाला अंतिमफेरीत प्रवेश मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. शिवाय चेन्नई येथील फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत ३४० धावा आणि ३० विकेट्स घेऊन टीम इंडियाच्या आर.अश्विनसह अनेकांकडून शाबासकी मिळविली. त्याग व मेहनतीचे फळ मिळत असल्याने वडील खुश आहेत. त्यांना हर्षला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाकडून खेळताना पाहायचे आहे. हर्षचा वर्तमान फॉर्म लक्षात लवकरच त्याच्या वडिलांची इच्छा पूर्ण होईल, यात शंका नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles