
रायपूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
✍️सतीश भालेराव, नागपूर
हिंगणा :- जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या प्रयत्नातून रायपूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. जिल्हा परिषद जनसुविधा अंतर्गत रायपूर येथील बाजार ओटयांचे बांधकाम, भूमिगत नाली, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नाली बांधकाम अशा एकूण चोवीस लक्ष रुपयाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जिल्हा परिषद नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, ग्रामपंचायत रायपूरचे सरपंच प्रेमलाल भलावी, उपसरपंच दीपावली कोहाड, माजी सरपंच इनायतुला शेटे ग्रा. प. सदस्य शिराज शेटे, जावेद महाजन, दत्तात्रय अडयाळकर,रफिक महाजन, लक्ष्मण बोदलखंडे,हरिष आंबटकर, चित्रा इटनकर, मंगला इटनकर,शुलभा कैकाडे, ज्योती चौहाण,वनिता राऊत, सुनीता नागपुरे,स्वीटी इटनकर, स्वाती पोहणकर,वच्छला मेश्राम, हरिष नागपुरे,चरण नागपुरे, जब्बारभाई महाजन, सुरेश लारोकर,सुहास कोहाड, समीर मेंडजोगे, शाहिद झडिया, सुरेश कैकाडे, स्वप्नील लारोकर,सुनील बोदलखंडे, अनिल बोदलखंडे,दिलीप नागपुरे, भाष्कर धार्मिक, नंदू इटनकर, दिलीप कुंभलकर,छत्रपाल पटले, रामा बागडे, सीताराम कुंभलकर, रामदास देवगडे,घनश्याम हिंगणेकर, ज्ञानेश्वर सातपुते, रसूल शेटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.