“मी पुन्हा आलोय”; लवकरच फडणवीस मुख्यमंत्रीपदी

“मी पुन्हा आलोय”; लवकरच फडणवीस मुख्यमंत्रीपदी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राज्यपालांना कोरोनाची लागण; शिंदेची भेट गुलदस्त्यात_

मुंबई: महाराष्ट्रात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे अशी सर्व भाजप आमदारांची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहता काही झाले तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. ‘मी पुन्हा आलोय’ हे राज्याला दाखवून देणार असल्याने लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे.

यासाठीच्या हालचाली कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत असे भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना व काँग्रेसची मते फोडली.

त्यातूनच त्यांच्या पाच जाग निवडून आल्या. आता शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते सध्या राज्याबाहेर आहेत. एकुणच शिवसेनेतील नाराजी उफाळून आलेली आहे. आज एकनाथ शिंदेनी राज्यपालाची दुपारनंतर भेट मागितली आहे. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून या संधीचे सोने करण्याची तयारी सुरू आहे असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सरकार अस्थिर असेल तरी काही तरी घडामोडी घडतील आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल.

मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाही याबाबत आमच्या पक्षसंघटनेत तरी अशी काही चर्चा झालेली नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीत पक्ष सांगेल त्याला सामोरे जायची आमची तयारी आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच देवेंद्र फडणीस होतील.

आणि यावेळी आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा ही तेच करतील. सरकार अस्थिर झाला आहे की नाही हे मला माहीत नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. पण या वेळी आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस विठ्ठलाची पूजा करतील असे सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles