कोल्हेवाडीत मध्यरात्री निघाला विषारी साप
हिंगणा: वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र.८ कोल्हेवाडी येथील रहिवाशी प्रमोद गाडगे आपल्या परिवारा सोबत दि २१ जून रोजी जेवण आटोपून अंदाजे बसले असताना रात्री १२ वाजता एक विषारी साप निघाला लगेच सर्प मित्र पराग वानखेडे यांना बोलावण्यात आले त्यांनी तात्काळ येऊन सापाला पकडले त्यामुळे रात्री कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रमोद गाडगे यांनी सर्प मित्राचे आभार मानले .