
हिंगणा विधानसभा क्षेत्रात आमदार आरोग्य कार्डचा शुभारंभ
गजानन ढाकुलकर, नागपूर
हिंगणा :- जन सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना सवलतीच्या दरात संपूर्ण वैद्यकीय उपचार देणे या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आमदार समीर मेघे यांचे कडून मातोश्री शालिनीताई दत्ताजी मेघे यांच्या ७८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ आमदार आरोग्य हेल्थ कार्ड ‘ गरजूंना देण्याचा आज बुधवार दि.२२/०६/२०२२ पासून उपक्रम सुरू करण्यात आला.
- या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दत्ताजी मेघे माजी खासदार यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, संध्याताई गोतमारे माजी जि.प.अध्यक्षा, मुन्नाभाऊ जयस्वाल, अविनाश गुजर ,कृपाशंकर गुप्ता नगर परिषद उपाध्यक्ष , डॉ.राजीव पोतदार , अरविंद गजभिये , अंबादास उके , हरीचंद अवचट माजी जि.प.सदस्य , अर्चना गिरी जि.प.सदस्या ,आतिष उमरे जि.प.विरोधी पक्ष नेता , सुरेश काळपांडे , सौ.लता गौतम नगराध्यक्षा , सौ.सुचिता चामाटे ,सौ.छाया भोसकर , नितीनभाऊ काळे बांधकाम सभापती नगर परिषद वानाडोंगरी , सौ.ललिता झलके माजी सदस्या संजय गांधी निराधार योजना , नलूताई आवारी , कल्पना सहारे , बालूभाऊ मोरे गटनेता , गुणवंत मते , आनंद धडांगे नगरसेवक , मुन्नीबाई यादव ,छाया कराडकर , सौ.ललिता राऊत ,सुलोचना झाडे नगरसेविका , उमेश आंबटकर ,अनिलभाऊ शर्मा , कैलास गिरी , विकास दाभेकर ,विनोद ठाकरे ,जयसिंग पटले , विजय घोडमारे , आदि भाजपा कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन मेंडजोगे यांनी केले.