क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन

क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे
फुटबॉल निवड चाचणीचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर : 25 ते 26 जून दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत खेळाचे प्रशिक्षण व संघ उभारणी, नव्याने खेळाडू भरतीसाठी वयोगट 14 ते 16 वर्षाखालील खेळाडूंची निवड चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे.

नागपूर व अमरावती विभागाचे 25 ते 26 जून या कालवधीत नेहरु स्टेडियम अमरावती येथे सर्व निवड चाचणी खेळाडूंनी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे. 14 व 16 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारिख 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2008 या दरम्यानची असावी. उंची अनुक्रमे 158 सेंटीमीटरच्यावर व 165 सेंटीमीटरच्यावर असावी. निवड चाचणीमध्ये खेळाडूंची उंची, शारीरीक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी या निकषानुसार निवड करण्यात येणार आहे.

या निवड चाचणीमध्ये फक्त खेळाडूंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवास व भोजन खर्च स्व:खर्चाने करण्यात यावा. चाचणीस येतांना खेळाडूंचा जन्मतारखेचा दाखला सोबत आणावा. असे नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles