ऑलिंम्पिक दिवसाच्या औचित्याने अमरावतीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा

ऑलिंम्पिक दिवसाच्या औचित्याने अमरावतीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

अमरावती:- 23 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून क्रीडा नगरीच्या रूपाने प्रसिद्ध अमरावती येथे सुद्धा ऑलिंम्पिक दिवस मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा उपसंचालक अमरावती, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ऑलम्पिक दिवस मोठ्या उत्साहात अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये डिस्टिक ॲमेचौर स्पोर्ट कराटे – डो असोसिएशन अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन आपल्या महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ लाठीकाठीची प्रात्यक्षिक सादर केले. व उपस्थित मान्यवरांचे, क्रीडा शिक्षकांचे, खेळाडूंची, क्रीडा रसिकांची मन जिंकून घेतले, यांच्या या प्रात्यक्षिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमांमध्ये कुमारी समृद्धी निमगडे, हर्षित रंगारी यांनी नुकताच झालेल्या पारंपारिक क्रीडा स्पर्धे मध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच सेन्साई सोनल रंगारी यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमांमध्ये आयोजक विभागीय क्रीडा उपसंचालक अमरावती विजय संतान, ॲड. प्रशांत देशपांडे सहसचिव महाराष्ट्र आॕलिंम्पिक असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा शिंदे, सचिव महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन प्रमोद चांदूरकर, शिव छत्रपती पुरस्कारार्थी व सचिव अमरावती जिल्हा अॕथेलेटिक्स असोसिएशन प्रा.अतुल पाटील, सचिव अमरावती जिल्हा शारिरीक शिक्षण विषय समिती डॉ. नितीन घावाळे, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ.अंजली ठाकरे, प्राचार्य शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालय स्वाती बाळापुरे, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ.मंगेश व्यवहारे, शिव छत्रपती पुरस्कारार्थी अजय आळशी, अध्यक्ष महानगर शारिरीक शिक्षण संघटना, संदिप इंगोले, कोषाध्यक्ष अमरावती जिल्हा शारिरीक शिक्षण विषय समिती,
संतोष अरोरा, संदेश गिरी, महेश आलोने, विजय मानकर, विकास चौधरी, व्हालिबॉल प्रशिक्षक म्हाला, फुटबॉल प्रशिक्षक राजाभाऊ आसरकर, व्हालिबॉल प्रशिक्षक कुणाल फुलेकर यांच्या उपस्थितीमध्ये सेन्सई सोनल रंगारी यांना सन्मानित करण्यात आले.

यांच्या सत्काराबद्दल क्रीडा अधिकारी संतोष विग्ने, शुभम मोहतुरे, थांगता प्रशिक्षक महावीर धुरंधर, कुडो प्रशिक्षक सेन्साई असलम शहा, नेटबॉल प्रशिक्षक नितीन जाधव, परवेश खान, संरक्षक बडगे, नगरसेवक प्रकाशभाऊ बनसोड, प्रा. डॉ. खुशाल अळसपुरे, सेन्सई राम पांडे, बॉक्सिंग कोच समीर खुरपे, गणेश तांबे, वैभव आदींनी यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles