अंनतशांतीचे राज्यस्तरीय पर्यावरणरक्षक पुरस्कार जाहीर

अंनतशांतीचे राज्यस्तरीय पर्यावरणरक्षक पुरस्कार जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कुलदीप खोत यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार_

सुभाष चौगले, कुडूत्री (प्रतिनिधी)

कोल्हापूर: अनंतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य, संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण रक्षक पुरस्कार (२०२२) जाहीर झाले असून कुलदीप खोत याना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.तर द्वितीय क्रमांक निसर्ग पर्यावरण संघटना सिद्धनेर्ली, यांना तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राचार्य अनिल चौगुले यांना प्राप्त झाला आहे.

दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून विविध पुरस्कार दिले जातात.१३ वर्षाच्या प्रदीर्घ काळ संस्थेने विविध पुरस्कार वितरित केले आहेत.५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धा घेण्यात आली होती.राज्यभरातील अनेक संस्था, संघटना,पर्यावरण प्रेमींनी आपले वृक्षसंवर्धनाचे औषधी वनस्पतींची लागवड या वर आधारित तयार केलेले प्रस्ताव व विडिओ संस्थेकडे पाठवले होते. त्यातून या निवडी करण्यात आल्या. पर्यावरण सरक्षणार्थ पर्यावरणाचे संवर्धन करणे पर्यावरणाचे प्रदुषण रोखणे, परिसरात शुद्ध हवा ठेवणे, वाढत्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा समतोल राखणे या अनुषंगाने पर्यावरण पुरक उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनंतशाती संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण रक्षक पुरस्कार स्पर्धा घेण्यात आली.

संस्थापक भगवान गुरव अध्यक्ष माधुरी खोत निवड समिती अध्यक्ष सुभाष चौगले सदस्य अरुणा पाटील, जे. के. गोरंबेकर, रसुल शेख, किरण पाटील यानी ह्या निवडी केल्या.सदर पुरस्कार- शशिकांत तिवले अध्यक्ष राजर्षि शाहु गव्हर्मेट सर्व्हटस को आँफ बँक कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर एम. एस. पाटील मा अध्यक्ष व विद्यमान संचालक राजर्षि शाहु गव्हर्मेट सर्व्हटस को आँफ बँक कोल्हापूर,अतुल गणपतराव जाधव, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक -राजर्षि शाहु गव्हर्मेट सर्व्हटस को आँफ बँक कोल्हापूर,रोहित प्रकाश बांदिवडेकर -कार्यकरी अंभियता कोल्हापूर पाटबंधारे , संचालक राजर्षि शाहु गव्हर्मेट सर्व्हटस को आँफ बँक कोल्हापूर, अरुणा पाटील, प्रार्थना शेलार, वअनंतशाती संचालक मंडळ
याच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक ३० जून २०२२ सायंकाळी ०५ वाजता स्थळ- महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ ३ रा मजला एम्पायर टाँवर टायटन शोरुम कोल्हापूर येथे वितरण होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles