छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव नागपूर

नागपूर:- लोक कल्याणकारी, आरक्षणाचे जनक, बहुजनांचे प्रेरणास्थान, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त २६ जून रोजी मअंनिस विविध उपक्रमांतर्गत “सामाजिक न्याय दिन” हे अभियान शाखांशाखामध्ये राबवायचे आहे.

*आपण खालील कोणत्याही प्रकारे उपक्रम साजरा करू शकतो.*

१)राजर्षि शाहूंच्या शिक्षण विषयक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या कामाची माहिती देणे व आपल्या परिसरातील दुर्लक्षित मुलांसाठी काम करणा¹या व्यक्ती ‚संस्था यांचे अनुभवकथन वा व्याख्यान याचे आयोजन करणे.
२)सनातनी प्रवॄत्तीचा धिक्कार व पुरोगामी वॄत्तीचा स्विकार‚प्रचार व अंगीकार करणा¹या सहकारी वा संस्थांचे अनुभव कथन ‚शाहुचे वेदोक्त प्रकरण, छात्राजगतगुरू नेमणूक ‚न्यायालयीन लढा इ. विषयांची माहिती देणे. आजच्या काळातील सनातनी शोषण परंपरा व रूढीं विषयक चर्चा घडवून आणणे.
३)आंतरजातीय विवाह‚ आंतरधर्मीय विवाह, विधवा आणि पुनर्विवाह यावर चर्चा, व्याख्यान देणे, यातून सामाजिक न्यायाचे तत्व मांडणे.
४)भटक्या विमुक्त समाजासाठी शाहू महाराजांनी वसाहत निर्माण करून अनेक बेरोजगार युवकांना अंगरक्षक‚पहारेदार व इतर नोकऱ्यात सामावून घेऊन त्यांना आत्मबळ दिले. या विषयावर काम करणे व त्याक्षेत्रातील साथींचे अनुभव कथन याचे आयोजन करणे.
५) शाहू महाराजांचे आर्थिक धोरण या विषयी चर्चासत्राचे आयोजन करणे. समाजातील बेरोजगारी नष्ट व्हावी यासाठी नवे उद्योग निर्माण करणाऱ्या साथींचे अनुभव कथन व या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
६)आरक्षणाचे जनक शाहू राजे, सामाजिक व आर्थिक विषमता हटवण्यासाठी आरक्षित जागा तरतुदी ‚गरज या विषयक चर्चेचे आयोजन करणे.
७) समता दिंडी काढून त्यातून स्वच्छता, आरोग्य, समता, बंधुता व एकतेचा संदेश देणे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles