विस्कटणं

विस्कटणं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिता व्यवहारे, अहमदनगर

“अरे चहा थंड होतोय”, आईच दोनदा दादाला सांगून झालं पण त्याचा आरशासमोर उभं राहून भांग पाडण्याचे काम चालूचं होतं. घेतो ना ग आई.,!म्हणत.. गेली दोन-तीन मिनिटे आम्ही त्याची गंमत पाहत होतो. खूप मन लावून भांग पाडत होता तो. आईचं ओरडणं… माझं आणि ताईच एकमेकींकडे बघून हसण चालू होतं. अखेर शेवटी झालं एकदाच म्हणून त्यानं कंगवा बाजूला ठेवत, मानेला जोराचा झटका दिला अन् दोन्ही हातांनी केस विस्कटवले.. ही त्याची रोजचीच स्टाईल.. आम्हाला माहीत होतं पण आई जाम चिडली.. हे काय इतका वेळ भाग पाडला आणि आता विस्कटवला.. काय ही तऱ्हा….. ताई म्हणाली, अगं आई आत्ताशी तो भांग पडलाय नीट बघ.. आई हसली आणि निघून गेली. आम्हाला त्याचे हे विस्कटवण आवडायचं. विस्कटणं तर प्रत्येकाने अनुभवलय.. स्वयंपाक घरात स्वयंपाक करणारी अन्नपूर्णा जेव्हा कणीक भिजवताना विस्कटलेल्या बटांना सावरायला जाते आणि चेहऱ्यावरील मेकअपमध्ये पिठाचे ठिपके दिले जातात ते पाहून कधी हसायला येतं कधी गंमत तर कधी भलताच वेंधळे पणा… मग कवी मनाचा नवरा गुणगुणायला लागतो.

तुझी अदा.. पाहून झालो मी फिदा
विस्कटणं तुझं असंच राहू दे सदा.

झाडाच एखादं फूल झाडाला तर मोहक दिसतच पण त्या फुलाच्या पाकळ्या करून त्या पसरवून केलेला गालीचा नुसता मोहकच नाही दिसत तर मनाला आल्हाददायक वाटून जातात.. म्हणजे काही गोष्टी विस्कटल्या तर शोभा देतात हे नक्की. एखादया सौभाग्यवती स्त्रीच्या कपाळावरील सौभाग्य शृंगाराच कुंकू, हातातल्या बांगड्या विस्कटताना पाहिलय आपण सुखदायक..असतं ते.. लग्न झाल्यानंतर पहिल्या मधुचंद्राच्या वेळी कपाळावरचं कुंकू विस्कटणं, हातातल्या बांगड्या फुटणं पाहिलं की गालातल्या गालात येणार हसू… आणि मग त्यातून स्वप्नांच्या दुनियेत होणारी सफर कित्ती कित्ती आनंद त्या विस्कटण्याचा. पण हेच कुंकू, याच बांगड्या जेव्हा पती निधनाच्या बातमीनंतर विस्कटवल्या जातात ना.. !बापरे काळीज चिरुन टाकणारं असतं ते दृश्य..! तरी सुख दुःखाचं, आशा-निराशेच कोणतंही विस्कटणं असो ते वेळीच सावरणं, आवरण, गरजेचं असतं नाहीतर सुख स्वप्नांचा हात सोडला जातो आणि भ्रमनिरास बनत सारं काही अन् विस्कटायला व सावरायला जिंदगीच ऊरत नाही.

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles