पहिली विदर्भस्तरीय संविधान परिषद नागपुरात १ जुलै रोजी
नागपूर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षांतर्गत महाराष्ट्रात पाच आणि महाराष्ट्र बाहेर पाच अशा एकूण १० संविधान परिषदांचे आयोजन करण्याचे ठरविले आहेत. त्यापैकी पहिली विदर्भस्तरीय संविधान परिषद नागपूर १ जुलैला दुपारी १२ ते ६ पर्यंत सिव्हील लाईन येथे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने राहतील. तर मुख्यवक्ते म्हणून प्रकाश पोहरे (देशोन्नती) माजी खासदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नाना पटोले, नितीन राऊत उर्जा मंत्री, खासदार प्रफुल पटेल, विजय वडेट्टीवार मंत्री ओबीसी कल्याण्य, राजेन्द्र पाल गौतम कॅबिनेट मंत्री दिल्ली सरकार, कृपाल तुमाने खासदार रामटेके, अॅड. वामनराव चटप, प्रा. जोगेन्द्र कवाडे, प्रफुल पटेल, प्रा.रणजीत मेश्राम, अॅड . फिरदोस मिर्जा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी या संविधान परिषदेला जास्तीत जास्त मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश महासचिव रमेश पाटील यांनी केले आहे.