
स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन आज
नागपूर: शहरातील अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) नागपूर संलग्न हिंद मजदूर संघाच्या वतीने 28 जून रोजी सकाळी 11 वाजता गुरुदेव सेवा आश्रम, आग्याराम देवी चौक, गणेशपेठ नागपूर येथे स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्क्षा एडवोकेट निशाताई शिवूरकर व उद्घाटक कमलताई परुळेकर यांची उपस्थिती राहतील. मुख्य अतिथी किसनताई भानारकर, सुजाताताई भोंगाडे, जयश्रीताई काळे यांची उपस्थिती राहतील. तसेच आयोजकांमध्ये अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा मायाताई ढाकणे, सचिव उज्वलाताई नारनवरे, आणि कोषाध्यक्ष उषाताई हाडगे यांची उपस्थिती राहतील.