धनंजय मुंडेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

धनंजय मुंडेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पत्नी करुणा शर्मा यांचा आरोप_

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी करुणा शर्मा यांनी यापूर्वी अनेक आरोप केले आहेत. आज पुन्हा या आरोपांची पुनरावृत्ती करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत केला. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असे त्या म्हणाल्यात.

*मुलीला धमकी*

माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडे हीच आजची पत्रकार परिषद घेणार होती; मात्र ती अनुपस्थित राहिल्याने मी पत्रकार परिषद घेत आहे, असे त्यांनी सांगितले. शिवानी, मुंडेंच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार होती; पण तिला धमकी दिल्याने ती आली नाही, असा आरोपही करुणा शर्मांनी केला.

मुंडेंच्या सांगण्यावरून मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढले, त्यांच्यावर विश्वास ठेवला; पण त्यांनी माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज केले, त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्यांच्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली, असाही आरोप त्यांनी केला.

मुंडे यांची पहिली पत्नी मीच आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा शर्मांनी केला. मी आजपर्यंत तोंड उघडले नाही, त्यांची इज्जत करत होते. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझ्या आईची मुंडेंनी हत्या केली आहे. मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. पवारांनी मुंडेंना मंत्रिपदावरून हाकललं पाहिजे. मुंडेंनी मला आणि माझ्या दोन मुलांना रस्त्यावर सोडले, असे त्या म्हणाल्यात.

*सुप्रिया सुळेंकडेही तक्रार*

या प्रकरणी मी सुप्रिया सुळेंकडेही अनेकदा न्यायासाठी विनंती केली; पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे माझी बहीण लवकरच देईल, असे करुणा यांनी सांगितले.

करुणा शर्मा म्हणाल्यात, “धनंजय मुंडे १० नंबरवरून का बोलतात? एका वेश्याचेही १० नंबर नसतात! मुंडे नेमके बोलतात कुणाशी ? मी खंडणी मागते, असा आरोप धनंजय मुंडे आरोप करतात. मी पाच कोटींच्या घरात राहते. त्याचे अडीच कोटींचे कर्ज माझ्यावर आहे. माझ्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतले आहे. माझ्या खात्यातून धनंजय मुंडेंना एक कोटी रुपये दिले आहेत. वेळोवेळी मी मुंडेंच्या सांगण्यावरून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले आहेत. मी सध्या सोनं विकून घर चालवत आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles