‘मै’ नही तो मेरी ‘घरवाली’ सही; इच्छुकांची नेत्यांकडे फिल्डिंग

‘मै’ नही तो मेरी ‘घरवाली’ सही; इच्छुकांची नेत्यांकडे फिल्डिंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अकोला :- मनपा अकोलाची मुदत मार्च – २०२२ च्या आठ तारखेलाच संपली. मात्र, आरक्षणाच्या तिढ्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. निवडणूक न झाल्याने मनपावर प्रशासक राज आले. त्यामुळे मनपात नगरसेवक होवू इच्छिणाऱ्या इच्छुकाचे देव काहीकाळ पाण्यात होते. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेनंतर मंगळवारी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

अकोला मनपात एकूण तीस प्रभागातून ९१ नगरसेवकांची निवड होणार आहे. यापैकी ४६ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. महिला आरक्षणानंतर तीन सदस्यी प्रभागा पद्धतीनुसार असलेल्या ३० पैकी २३ प्रभागातील प्रत्येकी दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्यात. तर आठ अनुसुचित जाती व एक अनुसुचित जमाती महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे उर्वरित ३७ जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांची गोची झाली आहे. महिला आरक्षणामुळे पत्ता कट झालेल्या पुरुष इच्छुकांनी ‘मै’ नही तो मेरी ‘घरवाली’ सही, म्हणत आपल्या सौभाग्यावतींसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्याचे काम सुरु केले आहे.

सन २०१७ च्या मनपा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने अनेक दिग्गजांसाठी मनपात परतण्याचा मार्ग मोकळा झाला तरी महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

एकंदरीत महिला आरक्षणामुळे काहीचा पत्ता कट झाला असला तरी मनपाच्या सभागृहात प्रवेश करण्यासाठी काही दिग्गजांची गणित सरळ झाली आहेत. त्यामुळे महिला आरक्षणामुळे सुखावलेल्या या दिग्गजांनी मनपा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles