
रुपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी देणा-यास अटक
पुणे: काही दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अज्ञात गावगुंडातर्फे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. पोलीस यंत्रणेचेही दाबे दणाणून सोडणा-या या धमकीने पोलीस प्रशासन जागे झाले.
ही धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर) असे या आरोपीचे नाव असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांचे बंधू संतोष बोराटे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.