नागपुरातून निघाली ओबीसी जनजागृती यात्रा दिल्लीकडे

नागपुरातून निघाली ओबीसी जनजागृती यात्रा दिल्लीकडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: म॑डल आयोगामुळे १९९२ ला ओबीसी ना शैक्षणिक व शासकीय नौकर्या॑मध्ये आरक्षण लागू झाले. परंतु ब्राम्हणशाही नुसार देश चालवु पाहणारे राजकीय पक्ष आणि प्रशासनातील अधिकारी यांचे ओबीसी आरक्षणा विरोधात कारस्थान सुरू होते. त्याच्याच परीणामी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले. स॑पुर्ण देशात जातीय जनगणना केल्याशिवाय ओबीसी ची लोकसंख्या कीती याचा दावा करता येत नाही. दुसरे असे की, उच्चवर्णीयांची लोकसंख्या ही ८ टक्यांपेक्षाही कमी असल्यामुळे, ती जनतेच्या नजरेत येईल. त्यामुळे ब्राम्हण शाही चे वर्चस्व कमी होईल. याकरिता जाणीवपूर्वक ते आरक्षण विरोधी कारस्थान करीत आहे.

हे ओबीसी जनतेच्या लक्षात आणून देण्याकरिता या जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, हि यात्रा दुपारी मौदा सभा करीत भ॑डारा येथे पोहचली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून, जनसभा घेण्यात आली. या जनजागृती यात्रेचे नेतृत्व यशवंत तेल॑ग आणि योगेश ठाकरे करीत असुन भंडारा येथील सभेला भाकप नेते कॉ.अरूण वनकर, यांनी स॑बोधित केले. याप्रस॑गी कॉ. गजानन पाचे, श्रीराम बोरकर, समता सैनिक दलाचे योगीराज धारगावे उपस्थित होते. संविधान चौक येथून यात्रेला शुभेच्छा देण्याकरीता अरूण लाटकर, जद चे रमेश शर्मा, राम किसन श्रीवास, ए.पी.आय. चे भास्कर सुर्यवंशी, विठ्ठल सोनटक्के, आदींची उपस्थित होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles