
सप्तसुरांची सदाबहार नगमे ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर: सप्तसुर प्रस्तुत सदाबहार नगमे, आयोजित कार्यक्रम 29 जून ला नुकताच पार पडला. यावेळी दीप प्रज्वलित करून अनिल पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. व कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंटिफिक हॉल आठरस्ता चौक लक्ष्मीनगर नागपूर येथे आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे संयोजक मनोज तांबे यांची संकल्पना असून ती पुर्ण झाली. यामध्ये गायक कलाकार शेख नाजिर, योगेश आसरे, आसिफ अली, अल मन्सूर, विना उकुंडे, रुही सूर्यवंशी, अदिती सिरसवान यांची गीते सादर केली. व संगीत मंगेश पटले, नंदू गोहाने, साऊंड वहिद भाई यांचे होते. या प्रसंगी पुर्ण कार्यक्रमात रज्जाक भाई यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमातील उपस्थित गेस्ट सिंगर इंजि.नितीन झाडे आणि समाजसेवक वसंतकुमार पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली सदा बहार नगमे कार्यक्रम पार पडला. यशस्वीरित्या दिवाकर चरडे, अनुप जैस्वाल, सचिन जावडेकर, जावेद पटेल, लकी खॉन आणि शालिनी सिन्हा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमांचा आनंद चाहत्यांनी, श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेतला.