संयुक्त बुध्दविहार समितीतर्फे 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन

संयुक्त बुध्दविहार समितीतर्फे 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

हिंगणा: तालुका संयुक्त बुध्दविहार समिती व मानव अधिकार संरक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने, 30/6/23 ला रेणुका सभागृह हिंगणा येथे आयोजित आरक्षणाचे जनक कोल्हापूर रीयासत चे राजे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने सन 2022 मध्ये झालेल्या 10 वी व 12 वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अभिनंदन तसेच पुढील उच्चशिक्षणासाठी अत्यावश्यक मार्गदर्शन समारोहाचे आयोजन करण्यात आले, प्रसंगी महापूरुषांना अभिवादन पर सामाजिक प्रबोधन गायक उमेश बागडे व संच यांनी सादर केले.

समारोहाचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन इंजी.नितेश कांबळे यांनी केले. समारोहाचे मार्गदर्शक प्रा.कीशोर बिरला, सचिव मानव अधिकार संरक्षण मंचचे आशिष फूलझेले, तथा मंचासिन विशेष सुरेश मानवटकर, अँड.एल.वाय.नंदेश्वर, सुभाष कोठारे, अशोक नगराळे तथा या समारोहाचे विशेष अतिथी व प्रायोजक सुनील थुल, सदस्य महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटना यांचा हा महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शासकीय सेवानिवृत्तीचा दिवस त्यांनी परीवारासह सामाजिक योगदानासह परीसरातिल नागरीकांसोबत साजरा करतांना ऐक संदेश देण्याचा मानस बाळगला की, सेवानिवृत्ती प्रसंगी महापुरुषांच्या विचारधारेला गतिमान करण्यासाठी सामाजिक प्रबोधन व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळे आयोजित करावे, हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीचे संचालक व मंचासीन अतिथी यांनी सुनील थुल व परिवारांचे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रविणकुमार कांबळे 73 टक्के, सुनिता प्रविणकुमार कांबळे 73 टक्के व कु.पल्लवी प्रविणकुमार कांबळे 82 टक्के हे वडील आई व पाल्य ऐकाच परीवारातिल तिघेही एकाच टर्ममध्ये दहाविची परिक्षा उत्तिर्ण झाले आहेत, तथा मेरीटचे विद्यार्थी वैभवी प्रमोद थुल, नमस्वि रवींद्र हुमने, दिव्यरत्न शेखर ऊके, शांक्षिती किशोर बारसागडे यांच्यासह 25 विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ व डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित विज्ञान विवेक आणि विद्यार्थी हे पुस्तक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. व विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणासाठी विविध समास्यांवर कसे नियोजन करायचे यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीचे संपर्क प्रमुख महेश वासनिक, प्रास्ताविक ज्ञानेश्वर कांबळे, आभार सुरेंद्र शेंडे यांनी मानले.

कार्यक्रमाला हिंगणा तालुक्यातील बुहुसंख्य विद्यार्थी त्यांचे पालक व नागरिक उपस्थित होते या समारोहाच्या यशस्वीतेसाठी उज्वला पुनवटकर, रेखा धूपे, विजय बोरकर, आदेश लोखंडे, अमोल रामटेके, सुबोध डाहाट, सुर्यकांत सयाम, प्रशांत दिवे, शालिंद्र खोब्रागडे, प्रमोद डूले, बंडू वानखडे यांनी अथक परीश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles