‘उत्सव’ पोर्टलवर महाराष्ट्र पर्यटन अव्वल स्थानी

‘उत्सव’ पोर्टलवर महाराष्ट्र पर्यटन अव्वल स्थानीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: पर्यटन मंत्रालयाच्या ‘उत्सव’ या डिजिटल पोर्टलवर ‘महाराष्ट्र पर्यटन’ अव्वल स्थानावर आहे. सन २०२१ मध्ये कोव्हिड-१९ च्या विळख्यात देश अडकला असताना पर्यटन मंत्रालयाने(MoT) utsav.gov.in वेबसाईट प्रक्षेपित केली.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या राज्यातील मंदिरांत होत असलेल्या पूजा-अर्चना व आरती यांच्या लाईव दर्शनाचे तपशील, पार पडलेल्या विविध कार्यक्रम आणि उत्सव याविषयी माहिती देण्यास सांगितले होते. याला महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्वरित प्रतिसाद देत सर्व आवश्यक तपशील सादर केले. ५ जुलै २०२२ रोजी पर्यटन विभागाद्वारे यशस्वी कार्यक्रम राबविणाऱ्या राज्यांची क्रमवार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

*ऑनलाईन दर्शनाचा पर्यायी मार्ग पुरवला*

अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे/मंदिरे/तीर्थक्षेत्रे असलेले महाराष्ट्र(Maharashtra) राज्य हे सर्वधर्मीयांसाठी पवित्रस्थळ म्हणून ओळखले जाते. शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर, वणी(सप्तशृंगी), मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर अशा धार्मिकस्थळी भाविक/पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. महामारीच्या काळात, जेव्हा भाविक या पवित्रस्थळांना प्रत्यक्ष भेट देऊ शकत नव्हते, तेव्हा मंदिर प्रशासनाने ऑनलाईन दर्शनाचा पर्यायी मार्ग पुरवला होता.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून केवळ व्यवस्थापनासाठीच नव्हे, तर भक्तांनाही त्यांच्या घरातूनच देवदर्शन घेणे सोयीचे झाले. पंढरपूरची वारी, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा, दहीहंडी, नारळी पोर्णिमा इत्यादी सणांसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. कोव्हिड काळात साजरे झालेले हे सण व संबंधित तपशील सुद्धा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles