नागपुरातील सावनेर येथे आलेल्या पुरात स्कॉर्पिओसह ६ जण गेले वाहून; तिघांचा मृत्यू तर ३ बेपत्ता

नागपुरातील सावनेर येथे आलेल्या पुरात स्कॉर्पिओसह ६ जण गेले वाहून; तिघांचा मृत्यू तर ३ बेपत्ता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तहसीलदार व पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल_

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

नागपूर: जिल्ह्यातील सावनेर तहसील क्षेत्रांतर्गत नांदागोमुख येथे नातेवाईकाकडे जेवणाला आलेले दातोर, मूलताई मध्यप्रदेश येथील परिवार जेवण आटोपून आपल्या स्कॉर्पिओने जायला निघाले असताना नांदागोमुख- छत्रापूर मार्गावरील ब्राह्मणमाळी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले़.

स्कॉर्पिओ गाडीत सहा जण होते़. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना मंगळवारी (१२ जुलै) दुपारी तीन वाजताच्या सुमाराची आहे़.
रोशनी नरेंद्र चौकीकर (३२) वर्षे , मधुकर पाटील (६५)वर्षे व निमू आठनेरे (४५) यांचा मृतांत समावेश आहे़ उर्वरित दर्श नरेंद्र चौकीकर (१०) वर्ष व चालक लीलाधर डिवरे ३८,वर्ष रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर) व निर्मला मधुकर पाटील (५५) या तिघांचा शोध सुरू आहे़.

प्राप्त माहितीनुसार, नांदागोमुख येथील रहिवासी सुरेश ढोके यांच्या मुलीचे लग्न ता. मूलताई, मध्यप्रदेश येथील मधुकर पाटील यांच्या मुला सोबत जून महिन्यातच झाले. मुलीच्या घरी व्याही भोजनाचा कार्यक्रम असल्याने मुलाचे वडील मधुकर पाटील, आई, बहीण, आत्या व पुतण्या नांदागोमुख येथे आले. पाहुणचाराचा कार्यक्रम आटोपून मूलताईला स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच ३१/सीपी ०२९९ ने जात होते़ ब्राह्मणमाळी पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, वाहन पुलाच्या मधोमध बंद पडले़ त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरू केली. पुलावर पाणी अधिक असल्याने एक ट्रक पुलाच्या कडेला उभा होता़ ट्रकचालकाने स्कॉर्पिओ बंद पडलेली बघून तत्काळ ट्रकमधील दोर त्यांच्याकडे फेकला. मधुकर पाटील यांनी वाहनातून उतरून वाहनाला दोर बांधला;परंतु पाण्याच्या वेगाने दोर तुटला़ वाहन पाण्याच्या प्रवाहात ढकलले गेले़ काही क्षणातच ट्रक चालकाने ही माहिती मोबाइल वरून गावातील नागरिकांना कळविली़ तत्काळ नांदागोमुख गावातील नागरिक व तहसीलदार प्रताप वाघमारे व हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बन्सोड , केळवद पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

स्कॉर्पिओ वाहन पुलापासून काही अंतरावर वाळूच्या खड्ड्यात अडकली होती़. पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी वाहन बाहेर काढले़ त्यात तीन मृतदेह होते, तर तिघेजण पुराच्या प्रवाहात वाहून गेले़ स्थानिक पोलीस व ढिवर बांधव आणि गावकऱ्याच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles