सेवानिवृत्त शिक्षक सिद्धार्थ ओंकार सरांचा सत्कार

सेवानिवृत्त शिक्षक सिद्धार्थ ओंकार सरांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ओंकार सरांनी शुन्यातुन प्रगती केली: पुरुषोत्तम पंचभाई_

गजानन ढाकुलकर

हिंगणा- अतिशय खडतड व गरीब परिस्थितीशी संघर्ष करुन सिद्धार्थ ओंकार सरांनी शुन्यातून प्रगती करुन आपला संसार उभा केला. आणि आता सुद्धा ते शिक्षकांच्या समस्येसाठी लढत असतात असे मनोगत पुरुषोत्तम पंचभाई यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षक सिद्धार्थ ओंकार सरांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाचे महासचिव बाळाभाऊ आगलावे , हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश गायकवाड ,सौ.विनाताई गायकवाड , सत्कारमुर्ती सिद्धार्थ ओंकार , माजी मुख्याध्यापक मनोहर वंजारी , सौ.पुष्पाताई ओंकार , म.मा.शिक्षक महासंघाचे नागपूर जिल्हा-अध्यक्ष सुनिल चौधरी व यशवंत जनबंधू उपस्थित होते.

सर्वप्रथम सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक सिद्धार्थ ओंकार सरांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन उपस्थित सर्व पाहुण्यांनी सत्कार केला.सिद्धार्थ ओंकार हे मित्रांच्या सुखदुःखात सहकार्य करणारे तथा शिक्षकांच्या समस्येसाठी लढणार व्यक्तीमत्व आहे.असे गौरवोद्गार पुरुषोत्तम पंचभाई यांनी व्यक्त केले.सिद्धार्थ ओंकार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कारमुर्ती यांचा परिचय बाळाभाऊ आगलावे यांनी तर संचालन आनंद महाले व आभार सुनिल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला म.माध्यमिक शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व ओंकार सरांचे नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles