भन्ते ज्ञानज्योति यांचे निवासस्थान ‘संगरामगीरी’ पर्यटन स्थळ सुरक्षित

भन्ते ज्ञानज्योति यांचे निवासस्थान ‘संगरामगीरी’ पर्यटन स्थळ सुरक्षित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर: संगरामगिरी पर्यटन स्थळ हे गेल्या ४५ वर्षांपासून तपोवन बुद्ध विहार ट्रस्ट च्या अधिवासात आहे. देश विख्यात भन्ते ज्ञानज्योति थेरो ह्या पर्यटन स्थळावर आपल्या १२ ते १३ भन्ते आणि श्रामनेर सोबत राहत असून तेथून बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहेत. प्रत्येक वर्षी सदर पर्यटन स्थळावर लाखो च्या घरात लोक येऊन आपली श्रद्धा प्रगट करीत असतात.

सदर पर्यटन क्षेत्र हे ताडोबा वाघ्य प्रकल्प/बफर झोनमध्ये येत असून, वन हक्क कायद्यानुसार भन्तेजी नि सदर जागा त्यांचा संस्थेला हस्थांतरीत करण्याचा दावा २०११ सालीच केला. सदर दाव्याला वर्ष २०११ ला ग्राम वन हक्क समितीने मान्यता दिली.त्या नंतर उप विभागीय अधिकारी यांचा अधिकाराखाली आयोजित जिल्हा वन हक्क समितीने सदर दाव्याला मान्यता दिली आणि जागा हस्तांतरनाकरिता जिल्हाधिकारी यांचा कडे फाईल पाठविली. त्यानंतर काही त्रुटींची पूर्तता करणे करिता पुन्हा फाईल वन अधिकारी यांचा कडे वर्ग करण्यात आली. तेव्हापासून भन्तेजी चा वन हक्काचा दावा प्रलंबित आहे.

वन हक्क कायद्याचा कलम ४ (५) अन्वये वन हक्काचा दावा प्रलंबित असतांना जागेवरून ताबा असलेल्या व्यक्तीला किंव्हा केलेल्या बांधकामाला हटविले जाऊ शकत नाही. ह्यालाच दुजोरा म्हणून वर्ष २०१५ चे आदिवासी कल्याण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे देखील वन हक्काचा दावा प्रलंबित असल्यास अतिक्रमण काढले जाऊ शकत नाही. वर्ष २०२२ साली जिल्हाधिकारी यांनी सुध्दा वन अधिकाऱ्यांना वन हक्काचे दावे प्रलंबित असल्यास, अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाऊ शकत नाही, हे स्पष्ट केले आहे. असे असून ही चूकीच्या माहितीच्या आधारे उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे धेंगरा नावाच्या महिलेने, संगराम गिरी येथे अतिक्रमण आहे असे खोटे सांगून, वन विभागाने अतिक्रमण हटवावे, अश्या आशयाची याचिका केली. उच्च न्यायालयाने सदर याचिका पहिल्याच सुनावनित निकाली काढली आणि कोणत्याच प्रकारचा आदेश तपोवन बुद्ध विहाराच्या विरोधात दिला नाही.

त्या मध्ये फक्त याचिकाकर्तीची याचिका निवेदन समजून त्या वर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे आदेश मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) यांना दिले गेले. विशेष म्हणजे सदर याचिकेत याचिकाकर्तीने “भन्ते ज्ञानज्योति यांचा वन हक्काचा दावा प्रलंबित आहे आणि त्यांना वन हक्क कायद्या अंतर्गत संरक्षण आहे, ही बाब जाणून बुजून याचिकेत नमूद न करता कोर्टाची फसवणूक करून, आदेश पारित करून घेतला. सदर उच्च न्यायालयाचा आदेशाचा गैरफायदा घेत वन अधिकाऱ्यांनी संग रामगिरी येथील बांधकाम गैरकायदेशीर पद्धतीने पाडण्याची जणू काही मोहीमच चालू केली.

१.भन्ते ज्ञानज्योति आणि त्यांचा संघाला विहारात जाण्यापासून थांबविणे.
२.अपमानास्पद वागणूक देने. विहारात येऊन जागा खाली करण्याची धमकी देने.
३.गैरकायदेशीर आदेश पारित करून पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन, भन्तेजी वर जागा खाली करण्याकरिता दबाव आणणे, अशे सर्व प्रकारचे काम करणे.

*समता सैनिक दल मुख्यालय दिक्षाभूमीची भूमिका.*

सदर प्रकारणसंदर्भात भन्ते ज्ञानज्योति थेरो यांनी फार व्यथित परिस्थितीत दिनांक १२.०४.२०२२ रोजी पहिल्यांदा ऍड. आकाश मून आणि ॲड. स्मिता कांबळे यांना संपर्क केला आणि वन अधिकाऱ्यांमार्फत होत असलेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली. त्या दिवशीपासूनच ऍड. स्मिता कांबळे यांचा पुढाकारात आणि नेतृत्वात समता सैनिक दलाच्या लीगल टीमने तपोवन बुद्ध विहाराचे संगरामगिरी पर्यटन स्थळ वाचविण्याचा प्रण घेतला. त्या नंतर नागपूर येथे मुख्य वनसरक्षक यांची भेट घेणे, चिमूर मधील पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेने, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, कायदेशीर दस्तऐवज तयार करणे इ. काम केले.
आंदोलनात्मक आज कायदेशीर मार्गाने आवश्यक ते सगळे कार्य गेल्या तीन महिन्यापासून दलामार्फत चालू आहेत.

परंतु तपोवन भूमी वर डोळा धरून बसलेली मनुवादी वृत्ती, ह्या ना त्या मार्गाने, संग रामगिरी वरील बांधकाम काढण्याकरिता, गैरकायदेशीर हाथकांडे आजमावत आहे. ताडोबा प्रकल्पात अनेक देवस्थाने आहेत पण फक्त संग रामगिरी विरोधातच वन विभाग जास्त आग्रही का आहे? हा प्रश्न देशातील समस्त भारतीयांना पडला आहे. इकडे मोठे अधिकारी भन्तेजींना आणि दलाला काहीच करणार नाही असे आश्वासन देतात आणि तेव्हाच दुसऱ्या बाजूने आपल्या अधिकाऱ्यांना सांगून बांधकाम पाडण्याचे षडयंत्र करतात. अश्यातच भन्तेजी ची बाजू न ऐकता एका वनअधिकार्याने ३ दिवसांच्या आत बांधकाम काढण्याचा नोटीस भन्तेजींना दिला. भन्तेजींना तात्काळ दलाने निवेदन बनवून दिले आणि दलाच्या सल्ल्यानुसार वरोरा येथील दिवाणी न्यायालयात ” वन विभागाने बांधकाम तोडू नये” ह्या आशयाचा मनाई हुकुम घेण्याकरिता केस टाकली. सदर केस मध्ये कोर्टाने सध्या “जैसे थे” (तात्पुरता मनाई हुकूम) देऊन तूर्तास संगरामगिरी पर्यटन स्थळाला संरक्षण दिलेले आहे.
पुढील तारखांवर सदर पवित्र स्थळाला संरक्षित करण्याकरिता योग्य ती सगळी कायदेशीर लढाई समता सैनिक दल लढणारच आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles