
“महाराष्ट्र ग्लॅम सीझन 3” मध्ये किमया राहुल झांबरे विजयी
_किमयाला बॉलिवूड मध्ये करियर करण्याची संधी_
नागपूर: मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना योग्य करियर ची संधी प्राप्त करून देण्यासाठी नागपूरात फॅबक्रियेटर इंटरटेंटमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे “महाराष्ट्र ग्लॅम सीझन 3 ” मध्ये मुलांचा श्रेणीत किमाया राहुल झांबरे (वय 7 वर्षे ) विजयी घोषित करण्यात आले.
कामठी रोड वरील ओबेरॉय पॅलेस येथे या स्पर्धेत 45 मुलांनी सहभाग नोंदविला होता. मात्र यामध्ये किमायाने रॅम्प वर उत्कृष्ट सादरीकरण करून आपल्या तल्लख बुद्धीने स्पर्धेतील सर्व प्रश्नांना योग्य उत्तर दिले. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धकाचा खिताब जिंकून शेकडो नागरिकांचे मने जिंकली.
या विजयामुळे किमयाला बॉलिवूड मध्ये लहानपणीच करियर करण्याची संधी मिळणार आहे. किमया दिल्ली पब्लिक स्कूल मिहानमध्ये केवळ 2 ऱ्या वर्गात शिकत आहे. ती खूप प्रतिभावान आणि रंगमंचावर सुपर परफॉर्मर आहे. तिने रंगमंचावर धूम ठोकली आणि शो दरम्यान अनेकांची मने जिंकली ..
Fabcreators Entertainment pvt ltd आणि ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून बॉलीवूडमध्ये अनेक मॉडेल्सना संधी दिली आहे. रेहान अन्सारी यांनी कोरिओग्राफ केलेले शो, विशेष पाहुणे आहेत मागील मिस्टर महाराष्ट्र ग्लॅम विजेते आणि मिस्टर डीसी इंडिया विनर. आणि अभिनेता, सुपर मॉडेल व्यंकटेश गुमलवार, नागपूरचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर शेख मुख्तार आणि सोशल इन्फ्लुएंसर रागिणी छापेरे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्याणी जैस्वाल या ड्रेस डिझायनर होत्या. राहत फातिमा आणि ईशा पारशिओनकर आणि ज्युरी सदस्य सुपर मॉडेल यतीश वैद्य, अभिनेता हिमांशू वहाणे आणि इमरान खान फॅशन कोरिओग्राफर उपस्थित होते. आयोजक फिरोज आलम आणि सागर शाहू यांनी शोसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.