
नागरिकांनी अवाजवी पाण्याचे देयके भरू नये; पंकज साबळे
प्रमोद गाडगे
अकोला : अकोला महानगर पालिकेने नागरिकांना पाण्याचे अवाजवी देयके (बिल) वाटप केलेले आहे, वास्तविक पाहता पाण्याचा एवढा वापर सुद्धा करण्यात आलेला नाही. अकोला महानगराच्या इतिहासा मध्ये असे देयके (बिल) पहिल्यांदाच देण्यात आल्याची घटना निदर्शनात येते. अकोला महानगर पालिकेने नागरिकांना दिलेल्या पाण्याचे देयका मध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करावी व वाजवी देयके (बिल) नागरिकांना देण्यात यावे करीता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जर या विषयावर लवकर कार्यवाही नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाक्षरी मोहीम घेऊन अकोला महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहे आणि तोपर्यंत नागरिकांनी देयके भरू नये तसेच ज्या नागरिकांनी देयके भरले असतील त्यांच्या देयका मध्ये दुरुस्ती करण्यात यावी असे आव्हान मनसे जिल्हाअध्यक्ष पंकज साबळे यांनी केले आहे तर संपुर्ण शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असे मनसे शहर अध्यक्ष सौरभ भगत यांनी माहिती दिली.
या प्रसंगी जिल्हाअध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे,शहरअध्यक्ष सौरभ भगत,उपजिल्हाध्यक्ष सतिश फाले,जिल्हा सचिव ललित यावलकर, शहर संघटक अरविंद शुक्ला, शहर अध्यक्ष राकेश शर्मा, शहर सचिव ऍड अजय लोंढे, तालुका अध्यक्ष सचिन गव्हाळे, मनविसे जिल्हाअध्यक्ष रणजित राठोड, भुषण भिरड,मनविसे उपजिल्हाअध्यक्ष डॉ जय मालोकार ,महिला जिल्हाअध्यक्ष सौ प्रशंसा अंबेरे,शहरउपाध्यक्ष चंदु अग्रवाल, शुभम कवोकार , विजय बोचरे,विभागअध्यक्ष मुकेश धोंडफळे, प्रेम पाटिल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.