
पीपल टू पीपल सोसायटी तर्फे चिखलदरा येथे तृतीयपंथीयांकरिता निशुल्क शिबिराचे आयोजन
नागपूर: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा “पीपल टू पीपल ” सोसायटी नागपूर द्वारा वर्षावासाच्या कालावधीत तृतीयपंथीयांकरिता ध्यान व नैतिक मूल्य संवर्धन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे जीवनाचे अधिष्ठान’ या विषयानुषंगाने ध्यान व नैतिक मूल्यावर आधारित जीवनाचे मौल्यवान मार्गदर्शन धम्मचारी अमोघ सिद्धी यांचे द्वारा करण्यात येणार आहे.
या शिबिरात प्रामुख्याने धम्मचारी रत्न सिद्धी, अनोमशूर ,आर्यरत्न , तेजधम्म व सूचीकीर्ती यांचा सहभाग असेल. शिबिरामध्ये मनःशांती करिता ध्यानसाधना शिकविण्यात येणार असून वैश्विक मैत्री विकसित करण्याकरिता मैत्रीभावना ध्यानपद्धतीचा सराव करवून घेतल्या जाईल, तसेच विषयाच्या स्पष्ट ते करिता गटचर्चा व प्रश्नोत्तरे इत्यादींच्या समावेश असेल .
नागपूर मधील विविध तृतीयपंथी गटातील सदस्य या शिबिरात सहभागी होत आहेत. शिबिराच्या आयोजनाकरिता संस्थेची चमू अतिशय सक्रिय आहे ज्यात प्रामुख्याने अनुश्री खोब्रागडे, सारिका पाटील , अश्वघोष राऊळ, संजीवनी संस्थेच्या सुषमा नागरे कांबळे , अतिश मेश्राम यांच्या समावेश आहे. या शिबिरात प्रामुख्याने समाज रत्न ऊर्जापुत्र डॉक्टर सुनील वाघमारे उपस्थित राहतील. यावर्षी हे शिबिर चिखलदरा मार्गावरील बिहाली येथील अचलभूमी धम्म प्रशिक्षण संस्थेच्या केंद्रात होणार असून दिनांक 5 ते 8 ऑगस्ट 22 पर्यंत हे शिबिर राहणार आहे.
शिबिरात पोहोचण्याकरिता बसची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली असून ह्या शिबिराचे स्वरूप पूर्णतः निशुल्क आहे. या शिबिरात सहभागी होऊन इच्छिणाऱ्यांनी मोबाईल क्रमांक 8459401059 वर संपर्क साधावा अशी माहिती संस्थेचे संचालक धम्मचारी तेज धम्म यांनी दिली.