स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला शिक्षकांचा सहकुंटुब आत्मदहनाचा ईशारा

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला शिक्षकांचा सहकुंटुब आत्मदहनाचा ईशारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ग्रामीण विकास विद्यालयाचे मुख्याध्यापकाने वेतननिश्चीती करुन दिल्यास आठ दिवसात या प्रकरणाचा निपटारा होउ शकतो. श्री. मेश्राम यांच्या कुटुंबावर यांचा विपरीत परिणाम झालेला आहे. सेवाकाळात आणि सेवानिवृत्तीनंतरही मला जो त्रास होत आहे. त्या त्रासाला कंटाळून मी माझ्या कुंटूंबासह 15 ऑगस्ट 2022ला आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रपरीषदेत सांगीतले.

अशोक पांडुरंग मेश्राम वय 58. मु.पो. नागभीड जि. चंद्रपूर हे जीवनविकास विद्यालय उमरेड येथून दि. 31 मे 2022 ला सहा. शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी ते दि. 1/07/1989 ला ग्रामविकास विद्यालय सालवा ता. मौदा जि. नागपूर येथे B.sc , B.Ed सहा. शिक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यांना 2 वर्षानंतर दि.30/06/1991 ला कोणतेही कारण न दाखवता शाळेतून बडतर्फे करण्यात झाले. त्याविरुध्द मेश्राम यांनी मा. शाळा न्यायाधिकरण मा. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय परत उच्च न्यायालयात दाद मागितली. मा. उच्च न्यायालयाने दि. 18/11/2015 ला यांचे बाजूने निकाल दिला. त्यामध्ये मुळ पदावर रुजू नियुक्ती दिनांकापासून सलग सेवा धरण्यात यावी व त्यांना सेवेचे सर्व लाभ तसेच 06/10/2005 पर्यंत चे वेतन व त्यावर 6% व्याज देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले.

परंतु या मगरुर मा. मुख्याध्यापक तसेच संस्थाचालकाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली व मला मागील लाभ तर दिले नाही. परंतू माझी 2015 ला नवीन नियुक्ती दाखवण्यात आली. त्यामुळे मला सेवेचा लाभ मिळाला नाही. तसेच विशेष बाब म्हणजे दि. 1991 ते 2015 पर्यंत मला कोर्ट केचरीच्या भानगडीमध्ये भयंकर त्रास देण्यात आला. त्यावेळी मी शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांना वारंवार मागील वेतनवाढी देण्याच्या अनुषंगाने मुख्याध्यापकाला सांगितले. परंतू त्यांनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही.

त्या अनुषंगाने मा. शिक्षणाधिकारी आणि मा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे वारंवार विनंती अर्ज देण्यात आले. परंतू कोणीही त्याची दखल घेतली नाही. मा. शिक्षणाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर माझी व्यथा त्यांना सांगितली परंतू ते मला न्याय देण्याऐवजी ते मगरुर संस्थाचालकाचीच पाठराखण करतात. तसेच शिक्षण उपसंचालकाची भेट घेतली असता ते तर ऐकुनच घेत नाही. यावरुन संस्थाचालक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या सर्वांचे साटेलोटे असावेत असे वाटते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles