शासकीय ब्युटी क्लरचर परीक्षा हिंगणा येथे संपन्न
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- शामरावजी देशमुख प्रियदर्शनी इंदिरा गांधी हायस्कूल हिंगणा मध्ये सौ.रंजना महेंद्रजी भावसागर प्रो.प्रा.रंजना राणी ब्युटी पार्लर रायपूर हिंगणा येथे पहिल्यांदाच शासकीय ब्युटी क्लरचर परीक्षा घेण्यात आली.
प्राचार्य श्रीमती रचना गायधने मॅडम यांच्या देखरेखीखाली ३० मुली परीक्षा मध्ये सामील होत्या. प्रथमच हिंगणा शहरात अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी सौ.रंजना महेंद्रजी भावसागर यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक केल्या जात आहे.