नागपुरात मनपा व जि.प.शाळेत पुरविण्यात आले नित्कृष्ट दर्जाचे झेंडे – निलेश नागोलकर

नागपुरात मनपा व जि.प.शाळेत पुरविण्यात आले नित्कृष्ट दर्जाचे झेंडे – निलेश नागोलकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- नागपूर महानगर पालिकेतील शैक्षणिक विभाग यांच्या कडून महानगर पालिकेच्या हद्दीत असणार्‍या जिल्हा परिषद शाळा आणि मनपा शाळा येथील सर्वच विद्यार्थ्यांसाठी हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळांच्या विद्यार्थ्यां कडून प्रति झेंडा पंधरा रुपये घेऊन त्यांना झेंडे पुरविण्यात आले. पण पुरविण्यात आलेले झेंडे चा दर्जा अत्यंत निकृष्ट असून तसेच त्याची कापणी व्यवस्थित नसून कुण्या झेंडा मध्ये अशोक चक्र डाव्या बाजूला तर तर कुठे उजव्या बाजूला असल्याचे निदर्शनात आले.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण विषय तिरंग्याच्या सॅम्पल दाखवून त्रुटी सह दाखविला. त्यावर त्यांनी जिल्हा परिषदेचे रविंद्र काटोलकर (माध्यमिक शिक्षण अधिकारी) साहेबांना फोन करून या संबंधी माहिती घेण्याचे आदेश दिले, त्यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या झेंड्याचे वितरण शहरातील शाळेमध्ये केलेले आहे.

यानंतर महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी मिष्रि कोटकर मॅडमची भेट घेऊन त्यांनी हा विषय सांगितला तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांना या विषयाची कल्पना दिली तसेच चुकीची व दिशाभूल करणाऱ्या तिरंगा चे वितरण शाळेत झाल्याचे सांगितले अशा चुकीचे वितरण झालेले तिरंगा शाळेत गेलेत या शाळेतून ते परत बोलावण्यासाठी त्यांना विनंती केली व लगेच त्यांनी ती मान्य करून प्रत्येक शाळांना चुकीच्या पद्धतीचे मिळालेल्या तिरंगा परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कारण तिरंग्याचा मान हा देशाचा मान आहे. त्याचा कुठे अपमान होवू नए हा या मागील एकमेव उद्देश होता. तसेच लहान विद्यार्थ्यांमध्ये चुकीचाही मेसेज जाऊ नये, तिरंगाबद्दल चुकीचा भ्रम निर्माण होऊ नये याकरिता प्रशासनातील झालेल्या चुकीचा त्यांना बोध करून देणे हा या मागील हेतू होता. असे निलेश नागोलकर सचिव राष्ट्र निर्माण संघटन नागपूर तर्फे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles