
पंडित दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेची वार्षिक सभा संपन्न
नंददत डेकाटे
उमरेड: पंडित दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद उमरेड अंतर्गत स्थापन जनकल्याण व विस्तार संघ जोगीठाणा पेठ उमरेड ची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा अहिल्याबाई होळकर सभागृह येथे संपन्न झाली सभेला प्रमुख अतिथी म्हणून श्री मंगेश खवले, मुख्य अधिकारी नगरपरिषद उमरेड माननीय श्रीमती सोनाली गजबे तालुका कृषी अधिकारी उमरेड श्री निर्मल कुमार घरत शहर अभियान, व्यवस्थापक तसेच माजी नगरसेविका श्रीमती सीमा कांदळकर उपस्थित होते.
सदर सभेमध्ये मा मुख्य अधिकारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर झेंडा या शासनाच्या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर झेंडा लावण्याबाबत आवाहन केले तसेच ध्वज संहितेतील बदलाबाबत व ध्वज संहितेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले श्रीमती श्रीमती सोनाली गजबे तालुका कृषी अधिकारी उमरेड यांनी महिला सक्षमीकरण व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करून योजनेत सहभागी होण्याबाबत आवाहन केले श्री निर्मल कुमार घरत शहर अभियान व्यवस्थापक यांनी बचत गट बळकटीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी माननीय श्री मंगेश खवले मुख्याधिकारी नगरपरिषद उमरेड यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना तिरंगा ध्वज वितरित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे वार्षिक अहवाल वाचन श्रीमती शालू मेश्राम कोषाध्यक्ष यांनी केले संस्थेचे अध्यक्ष श्रीमती पुनम गजघाटे यांनी संघाच्या वाटचालीसाठी नियोजन आणि आढावा सदर केला स्वच्छ भारत अभियान नगर परिषद उमरेड अंतर्गत ओला कचरा सुद्धा कचरा विलगीकरण स्टिकर लावून जनजागृती मोहीम मध्ये तीन गटातील दहा महिलांना रोजगार मिळाला तसेच कृषी अधिकारी उमरेड यांच्याकडून 1500 माती परीक्षण नमुने पिशवी बनवण्याचे काम दोन बचत गटांना देण्यात आले असल्याचे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नेहा गुंडलवार यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती आम्रपाली दोडके यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लता वराडे यांनी केले. कार्यक्रमास माविस क्षत्रिय समन्वयक मंगला बघेल मॅडम उपस्थित होत्या प्रतिभा गजबे संयोगिनी उपस्थित होत्या.
तसेच भक्ती व विस्तार संघ गंगापूरच्या अध्यक्ष श्रीमती गीता धुळे उमेद वस्तिवस्तार संघ, मंगळवारी पेठ च्या अध्यक्ष धनमाला सुपारी नारीशक्ती वस्तिस्तर संघ बुधवार पेठ च्या अध्यक्ष ज्योती घरतकर उड्डाण वस्तीवस्तर संघ, इतवारी पेठ च्या अध्यक्ष विशाखा वाघमारे उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाला शहरातील ८ ही वस्ती स्तर संस्थेचे पदाधिकारी व बचत गटातील २२९ महिला उपस्थित होत्या.