मनपा नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत गंभीर नाही; ‘आप’

मनपा नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत गंभीर नाही; ‘आप’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरात आज आम आदमी पार्टी, प्रभाग क्र.8 उत्तर नागपूर तर्फे नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यी करण्याबाबत सहायक आयुक्त सतरंजीपुरा झोनला प्रभागाचे संयोजक विजय नंदनवार यांचा नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

प्रभाग क्रं ८ अंतर्गत नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या वतीने मागील वर्षी अनेक मोर्चे आंदोलन करण्यात आले. तसेच मागच्या वर्षी ९ ऑगष्ट क्रांती दिनापासून ४२ दिवस साखळी उपोषण सतरंजीपूरा झोन पार्टी कडून घेण्यात आले. मनपा प्रशासनाने सोळा लक्ष पंचावन हजार मंजूर करून सौंदर्यीकरणाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साखळी उपोषण तुटले. तरीही एक वर्ष लोटूनही आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही .

महाराष्ट्र राज्य शासनाचे वतीने सौंदर्यकरण साठी २ कोटी रुपये मंजूर झाल्यावरही मनपा प्रशासन नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्या करण्याबाबत गांभीर्य नाही. याकरिता उत्तर नागपूर तसेच प्रभागाचे सर्व पदाधिकारी यांनी सहायक आयुक्त सतरंजी पूरा झोन यांना निवेदन देवून काम कुठ पर्यंत पोहोचले हे विचारण्यात आले.

यावेळी उत्तर नागपूर अध्यक्ष रोशन डोंगरे , उत्तर नागपूर संघटनमंत्री प्रदिप पौनिकर,उत्तर नागपूर सचिव डॉ. अमेय नारनवरे,उत्तर नागपूर कोषाध्यक्ष नरेश महाजन,विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष ऍड. सौरभ दुबे,नानक धनवाणी हरेश निमजे, पंकज मेश्राम,अनिल संभे, अरुण गुणारकर, सुनील गजभिये, अब्दुल सलाम, नासीर शेख,किशन निमजे, पंकज मिश्रा, माणशिंग अहिरवार, प्रमोद चौधरी,विशाल वैद्य,जावेद मालाधारी,मीना निमजे, किशन रणदिवे, सेवकरांम निमजे, छबी निमजे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles