
काय सांगताय..? इटियाडोह धरण झालाय ओव्हरफ्लो
_उमळणार निसर्गप्रेमींची गर्दी._
तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया: शहरातील अख्खी गाढवी नदी अडवून सिंचन व जलविद्युत या उद्देशाने बांधण्यात आलेलं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/ मोर. तालुक्यातील गोठणगाव येथील ईटियाडोह धरण तिनही बाजूने निसर्गाच्या डोंगर कुशीत वसलेले आहे सहा दिवसांपूर्वीच पाण्याची पातळी तब्बल तीन फूट खाली होती. यावर्षी धरण भरेल की नाही अशी शंका अनेकांच्या मनात येत असतानाच तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जलाशयाच्या पातळीत आज 92. 16% वाढ झाली. दि.11/08/2022ला जलाशयाची पातळी 254.90 मी. होती. आजचा उपयुक्त पाणीसाठा 292.97 दलघमी होता.
पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण ओव्हरफ्लो होऊ शकतो त्यामुळे नदी काठावरील केशोरी, प्रतापगड, तिबेट कॅम्प अशा सर्व गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला व नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना पूर नियंत्रण कक्षाने अतीदक्षतेचा इशारा दिला आहे.
बघता बघता अवघ्या तीन तासातच आज धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन संध्याकाळच्या सुमारास ईटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. हा सुंदर नजारा बघण्यासाठी उद्यापासून निसर्गप्रेमींची गर्दी उसळणार.