गुजरातमध्ये ५१३ किलो अंमली पदार्थ जप्त; मुंबई पोलिसांची मोहिम यशस्वी

गुजरातमध्ये ५१३ किलो अंमली पदार्थ जप्त; मुंबई पोलिसांची मोहिम यशस्वी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अंकलेश्वर/ गुजरात: मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी भरूचमधील अंकलेश्वर परिसरातून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले तसेच जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये एवढी आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींना अटकेत घेतले आहे. यापैकी 5 जणांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली असून दोन आरोपी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कोठडीमध्ये आहेत.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी शिवाजी नगर येथून अमली पदार्थांची खेप पकडल्यानंतर त्याचा स्रोत शोधण्यामध्ये पोलिस गुंतले होते. ही खेप पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला आहे आणि यासाठी मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष सातत्याने कार्यरत होता.

गेल्या 13 तारखेला गुजरातमधील अंकलेश्वर येथूनही एक खेप पकडण्यात आल्याने संघाला मोठे यश मिळाले आहे. अनेक राज्यात पसरलेली ही आंतरराज्यीय अमली पदार्थ टोळी असल्याचे पोलिसांना वाटते आहे. ही टोळी विशेषतः तरुणांना टार्गेट करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles