स्वातंत्र्य सैनिक यशोदाबाई रोडबाजी गवळी यांचा बी.आर.एस.पी. तर्फे सत्कार
नागपूर: दि. ९ ऑगस्ट १९४२ च्या चले जाव आंदोलनात वर्धा जिल्हयातील आष्टी येथील गावकऱ्यांनी पोलीस चौकीला आग लावून इंग्रजांचा निषेध केला तर पोलीसांनी गोळीबाळ करून गावकऱ्यांना तुरूगांत डांबून गाव सील केले. या आंदोलनात आष्टी येथील रोडबाजी गवळी व यशोदाबाई रोडबाजी गवळी हे दोघे पती-पत्नी सहभागी होते. त्यांनी तुरूंगवास ही भोगला.
आज ९० वर्ष वय असलेल्या व सध्या नरेंद्र नगर येथे आपल्या अधिकारी असलेल्या मुलाकडे वास्तव्यास असलेल्या स्वातंत्र्य सेनानी यशोदाबाई रोडबाजी गवळी यांच्या घरी जाऊन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महिला आघाडी विदर्भ प्रदेश संयोजिका विश्रांतीताई झांबरे यांनी त्यांचा सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. याप्रसंगी मायाताई मेश्राम, विलास पारखंडे, चंद्रभान मेश्राम, किशोर सोमकुवर, रेखा मेश्राम, छायाताई कुरूटकर उपस्थित होते.