बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक ऊर्स रविवारपासून

बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक ऊर्स रविवारपासून



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उत्सव 21 ऑगस्ट 3 सप्टेंबर दरम्यान भव्य आयोजन_

नागपूर : वैच्छिक समरसतेचे प्रतीक असलेल्या सुफी संत बाबा ताजुद्दीन यांचा 100 वा वार्षिक उर्फ 21 ऑगस्ट 3 सप्टेंबर दरम्यान उमरेड मार्गावरील ताजबाद शरीफ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वार्षिक उर्सनिमित्त ताजाबाद मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती हजरत बाबा ताजुद्दीन चे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद, राजा फारुख बावला, बुर्जीन रांडेलीया, मुस्तफा टोपीवाला, इमरान खान, गजेंद्र पालसिंह लोहिया उपस्थित होते.

उल्लेखनीय आहे की, कोविड संसर्गामुळे दोन वर्षानंतर बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक ऊर्स होत आहे. त्या दृष्टीने ताजबाद ट्रस्टने विशेष तयारी केली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रशासनाकडून ही सहकार्य केल्या जात आहे. बाबा ताजुद्दीन यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक अनुयायी शंभराव्या वार्षिक ऊर्सनिमित्त ताजाबाद येथे येणार आहे. ताजाबाद परिसरातील वाहतूक सुरक्षा व्यवस्था, आदींबाबत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न होत आहे

.वार्षिक उर्फ प्रसंगी अनेक कार्यक्रम होत आहेत. 21 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 वाजता. दर्ग्याचे सज्जादानशीन सय्यद युसुफ इक्बाल ताजी मुक्ती अब्दुल कदीर खान यांच्या अध्यक्षतेखाली राजे भोसले यांच्या हस्ते पारंपारिक विधीने ऊर्सची सुरुवात होईल. ताजाबादच्या शाही मशिदीचे इमाम मौलाना खुर्शीद आलाम खान यांचे कुराणचे पठण होईल. याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरू मौलाना सय्यद मोहम्मद हाश्मी मियाँ उपस्थित राहतील. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता. ताजबाद दर्गा संकुलात आंतरराष्ट्रीय सुफी कॉन्फरन्स मध्ये संवाद साधणार आहे. आणि 25 ऑगस्ट रोजी, सकाळी १० वाजता. हजरत बाबा ताजुद्दीन कार्यालयातून दरबारी शाही संदल काढण्यात येणार आहे. वार्षिक ऊर्सदिवशी हजरत बाबा ताजुद्दीनचे सर्व विश्वस्त हेलिकॉप्टरमधून दर्ग्यावर पुष्पवृष्टी करतील. असे यावेळी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles